"रिक्षात विसरलेली सोन्याची बॅग; देवपूर पोलिसांनी दाखवली चपळाई"
📝 बातमी (News Article):
धुळे | प्रतिनिधी
देवपूर परिसरात हरवलेली 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढत मालकाला परत दिल्याची उल्लेखनीय घटना घडली आहे.
अशोक रमण पाटील (रा. धनदाई नगर, देवपूर, धुळे) हे दुपारी सुमारे 3.15 वाजता लग्नकार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांनी स्टेडियम परिसरातून रिक्षा (MH-19 BH 1550) करून देवपूर बसस्टँड येथे उतरले. मात्र उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, कपडे व सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षातच राहून गेली आहे.
त्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र बॅग व रिक्षा न मिळाल्याने त्यांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ हालचाल करत परिसरातील CCTV फुटेज तपासले तसेच रिक्षांची माहिती गोळा केली.
तपासादरम्यान संबंधित रिक्षा चालक मुस्तफा निसार अहमद अन्सारी (रा. 80 फूट रोड, उस्मानिया मशिदीजवळ, धुळे) याच्याशी संपर्क साधण्यात आला. त्याने प्रामाणिकपणे बॅग पोलिस स्टेशनमध्ये जमा केली.
पोलीस स्टेशनमध्ये बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये 15 तोळे सोन्याचे दागिने व कपडे सुरक्षित असल्याचे आढळले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय देवर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार थुसर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी.डी. बोरसे व त्यांच्या पथकाने केली.
या तत्पर कारवाईमुळे नागरिकांकडून देवपूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
🏷️ Tags:
Dhule News, Devpur Police, Lost Bag Found, Gold Jewellery Recovery, Maharashtra Police, Breaking News Dhule, CCTV Investigation, Honest Auto Driver, Local News Dhule
