पी.टी. आर्ट्स आणि आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान दिनाच्या निमित्ताने *"प्रोटॉन - पॉझिटिव्हिटी थ्रू ऍक्टिव्हिटी"* हा कार्यक्रम उत्साहात साजरा
नाशिक - युवराज राजपूत
एच.पी.टी. आर्ट्स आणि आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने *"प्रोटॉन - पॉझिटिव्हिटी थ्रू ऍक्टिव्हिटी"* हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
एच.पी.टी. आर्ट्स आणि आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी 2026 या निमित्ताने *"प्रोटॉन - पॉझिटिव्हिटी थ्रू ऍक्टिव्हिटी"* हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील भौतिकशास्त्र विभागातील सुमारे 80 विद्यार्थी सहभागी झाले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. के. अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. अश्विनी घनबहादूर, उप प्राचार्य प्रा. प्रणव रत्नपारखी व विभागातील शिक्षक-शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पदार्थ विज्ञान विभागातील निवृत्त प्राध्यापक एस. एम. शिंपी आणि प्राध्यापक डी. एस. जोशी यांनी परीक्षक म्हणून काम केले. या प्रदर्शनास नाशिक मधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रात्यक्षिक तसेच पोस्टर द्वारे भौतिकशास्त्रातील विविध संकल्पनांची माहिती घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन
पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर एस. पी. रॉय, डॉ. उज्वला म्हस्के डॉ. एस बी पगार तसेच भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक यांनी केले.
