बोराडी ग्रामपंचायत राज्यात द्वितीय; ‘माझी वसुंधरा’त सव्वा कोटींचे पारितोषिक!
शिरपूर प्रतिनिधी.
शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय ‘माझी वसुंधरा’ अभियानात द्वितीय क्रमांक पटकावत तालुक्याचा आणि जिल्ह्याचा मान उंचावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बोराडी ग्रामपंचायतीला सुमारे सव्वा कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले असून त्याच्या मित्रांनी समारंभ नुकताच पार पडला.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, हरित ऊर्जा, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विविध निकषांवर बोराडी ग्रामपंचायतीने प्रभावी कामगिरी केली. लोकसहभाग, पारदर्शक कारभार आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील दोन वेळा मानाचे पारितोषिक या पंचायतीचे मिळवले आहेत
गावात राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमा, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त अभियान, सौरऊर्जेचा वापर, तसेच स्वच्छता उपक्रम यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला गेला. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही यशस्वी झेप शक्य झाली. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार, आणि लोकनेते राहुल रंधे, डॉक्टर तुषार रंधे,ग्राम विकास अधिकारी, सरपंच ,उपसरपंच, सदस्य व नागरिक यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने विविध विकासकामे प्रभावीपणे राबवली. या पारितोषिकामुळे गावातील पायाभूत सुविधा, पर्यावरणीय उपक्रम आणि डिजिटल सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.
या यशाबद्दल ग्रामस्थ, पदाधिकारी आणि प्रशासन यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून बोराडीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
