केतन पंडीत यांचा समाजातर्फे भव्य सत्कार*‘ब्राह्मण रत्न’ पुरस्कार व धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल गौरव*

 


*केतन पंडीत यांचा समाजातर्फे भव्य सत्कार*‘ब्राह्मण रत्न’ पुरस्कार व धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल गौरव*


शिरपूर : ब्राह्मण समाजाच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते केतन पंडीत यांना मिळालेल्या ‘ब्राह्मण रत्न’ समाज पुरस्काराबद्दल तसेच अखिल भारतीय संयुक्त ब्राह्मण समन्वय समितीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

हा सत्कार सोहळा भगवान परशुराम चौक, मारवाडी गल्ली, शिरपूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केतन पंडीत यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार व जबाबदारी देण्यात आली असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण समाज संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वासही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना केतन पंडीत यांनी समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानून, पुढील काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने