थाळनेर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचा लाचखोरीचा पर्दाफाश; ₹२ लाखांची लाच घेताना एक रंगेहात

 


थाळनेर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचा लाचखोरीचा पर्दाफाश; ₹२ लाखांची लाच घेताना एक रंगेहात


थाळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी एका तक्रारदाराकडून वडिलांच्या अटकेचा धाक दाखवून लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी केलेल्या सापळा कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांना ₹२,००,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, तर अन्य तीन पोलीस कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मुकेश गिलदार पावरा (वय ३३) – पोलीस कॉन्स्टेबल, 

भुषण यशुपाल रामोळे – पोलीस हवालदार,

धनराज बबन मालचे – पोलीस कॉन्स्टेबल, 

किरण सखाराम सोनवणे – पोलीस कॉन्स्टेबल,

(सर्व नेमणूक : थाळनेर पोलीस स्टेशन) यांच्या वर आरोप ठेवण्यात आला आहे.


तक्रारदार हे मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वर पाडा तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांविरुद्ध  थाळनेर पोलीस ठाण्यात  अंमलीपदार्थ विरोधी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी वडिलांना अटक न करण्याच्या मोबदल्यात वरील चारही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे ₹३,००,०००/- रुपयांची लाच मागितल्याची माहिती तक्रारदाराने दूरध्वनीद्वारे लाचलुचपत विभागाला दिली होती.

या माहितीनुसार दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बभळाज, तालुका शिरपूर येथे जाऊन तक्रार नोंदवली. पडताळणीअंती पंचांसमक्ष तडजोड करून ₹२,००,०००/- रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.

यानंतर सापळा कारवाई दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी तक्रारदाराकडून ₹२,००,०००/- रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.


सदर सापळा कारवाई पोलीस निरीक्षक कलाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींचा समावेश होता.


या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करत असून, यांना मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र) यांचे लाभले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने