*२१ जानेवारी ला मुंबईच्या आझाद मैदानावर पिवळे वादळ धडकणार*
दोडाईचा अख्तर शाह
दोंडाईचा - शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक होळी चौक येथे जालना येथील उपोषणकर्ते दिपक बोराडे यांचा संवाद मेळावा संपन्न झाला. धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटी चे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी १७ सप्टेंबर रोजी जालना येथे दिपक बोराडे यांनी १६ दिवस उपोषण करुनही सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे २१ जानेवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. धनगर समाजाला घटनेने दिलेले आरक्षणाची फक्त अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे सातत्याने करुनही सरकार दखल घेत नाही आता २१ जानेवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात होणार आहे त्यासाठी दिपक बोराडे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. दिपक बोराडे यांचा दोंडाईचा शहरात मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला अभिवादन करुन समाज बांधवांशी संवाद साधला या संवाद मेळाव्यात बोलताना २१ जानेवारी ला मुंबईत पिवळे वादळ धडकणार असा इशारा दिपक बोराडेंनी सरकार दिला जास्तीत जास्त संख्येने धनगर समाज बांधवांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपस्थित राहावे असेही आवाहन दिपक बोराडे यांनी शेवटी केले. यावेळी समाज अध्यक्ष सुनिल धनगर, नगरसेवक भैय्या धनगर, माजी नगरसेवक भुपेंद्र धनगर, भाजप शहर उपाध्यक्ष मनोज धनगर, सुभाष नाना बोरसे, धावडे गावाचे सरपंच जगदीश पाटील, पप्पू दादा धनगर,सागर पदमोर, देविदास पाकळे, संदीप धनगर, गटू धनगर,पुंजू दादा बोरसे, सोमनाथ बोरसे, पंडीतराव भामरे, वाल्मिक दादा आडगाळे, योगेश लांडगे, देवा नाना लांडगे,अक्षय धनगर, महेंद्र धनगर, अशोक पारखे, धाकू आडगाळे,पवन आडगाळे, नरेंद्र बाबिस्कर, राजू धनगर, प्रतिक माळके संजय बोरसे, छोटू मुजगे यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
