उप जिल्हा रुग्णालय शिरपूर येथील कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नेताजी परिवाराकडून सन्मान
शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी विनोद देविदास निकम यांची कक्ष सेवक पदावरून कनिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती झाली. त्यांनी आपल्या सेवाकाळात 25 वर्ष सेवा दिली असून शिंदखेडा नंदुरबार दोंडाईचा या ठिकाणी आपली सेवा दिल्यानंतर शिरपूर येथे मागील 14 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सेवाकाळात दिलेली प्रामाणिक सेवेची दखल घेत नेताजी मित्रपरिवार यांनी त्यांना मिळालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचे रुग्णालयात जाऊन अभिनंदन केले. सोबत भगवान दगडू बोरसे यांची देखील कक्ष सेवक पदावरून प्रयोगशाळा सहाय्यक पदावर पदोन्नती, सपना मोहन माळी यांची देखील कक्ष सेवक पदावरून प्रयोगशाळा सहाय्यक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल देखील त्यांच्याही सन्मान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नेताजी मित्रपरिवार, युथ फ्रेंड सर्कल, नेताजी केबल नेटवर्क चे सदस्य उपस्थित होते. आपण आमच्या कामाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त केली याबद्दल या सर्वांनी मित्र मंडळाचे आभार व्यक्त केले.
