शेतकरी बैल मित्र प्रदीप पाटील,गणपूर ता. चोपडा,जिल्हा. जळगाव

 


शेतकरी बैल मित्र

प्रदीप  पाटील,गणपूर ता. चोपडा,जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

बैल पाळत होता बैल पाळता पाळता स्वतः बैल झाला असंच मला वाटतं. बैलाचा मित्र पण बैलचं ना? या माणसांच्या जगात शेतकरी बैलाला राबवत असे आणि शेती करतं असे आणि करतोय. बैल जसं मुकाट्यानं कामं करतोय करतं आलाय.थकला वृद्ध झाला  नाही काम करतं खुंट्यावर तो  मरतो. मालक थोडं औषध पाणी करतो. थकला की मेला. शेतकरी दुसरा घेतात अन आपलं राहाट गाडा हाकत आलाय अन येत असतो.  काही शेतकरी बैल थकला तर कसायाला विकून टाकतात तसे अगदीच कमी आहेत पण विकणारे पण आहेत. कसायाच्या दावणीला नेऊन टाकतात. आज बिनकामी झाला म्हणून मारून टाका. असंच अल्प अशी दृष्ट शेतकरी करतं असत किंवा करतात. काम करतोय तोवर किंमत. काम करतांना सुद्धा आरीचा घोदा हा आहेच. काठीला मोठा खिळा असतो टोचायला अगदी रक्त निघे पर्यंत जोरात खिळा टोचतात.नाहीतर चाबकाने मारतात बिच्चारा बैल सहन करतो म्हणून सारं काही दृष्ट शेतकरी किंवा त्यांनी लावलेला सालदार किंवा रोजनदार बैलाला मारतात ठोकतात काम करून घेतात. पूर्वापार असंच चालतं आलंय अन चालतंय. बैलाने मालक साठी कितीही केलं तरी राबणं त्याच्या पाचवीला पुजलेलं. मालकाची गुलामी त्याच्या नशिबी. मालक सालदार जो चारा खाऊ घालेल तेच खायचं तेच पाणी प्यायचं ठेवेल तसंच राहायचं. दिलं ते गप्प बसून सहन करतं राहायचं असंच बैलाचं जीवन. गुलामीत जीवन जगतो बैल. बरं एवढंच नाही बैलाची राबन्याची ताकत कमी होऊ नये म्हणून शेतकरी बैलाला वयात आल्या बरोबर त्याला कात्री लावत असतो. कात्री लावणे म्हणजे बैलाची गाई वर कामक्रीडा साठी ची शक्ति बंद करणं. त्याला वांज करणं. बैलाच्या वीर्य गाठ म्हणजे आंड कुटत असतं किंवा कात्री लावता किती वेदना त्या बैलाला होतं असतील त्याची वेदना शेतकऱ्याला काहीच वाटतं नाही. त्याची प्रजनंन क्षमता सुद्धा बंद करतात. त्याच्या भावना सुद्धा मारून टाकतात.दृष्ट  शेतकरी माणुस शेतकरी जसा आजपर्यंत वागत आला. पशु सारखा पशु बैल पण त्याच्या पेक्षा शेतकरी हा पशु झालाय होता अन आहे.अन असा अत्याचारी अत्याचार करणारा शेतकरी. बैल पाळतो तर मी बैलाची काळजी घेतो असं दाखवतो. असा आव आणतो. नुसतं म्हणतो शेतकऱ्याचा मित्र आहे बैल. त्याची काळजी घेणं नुसतं दाखवायचं . एक दिवस पोळ्याला सजवायचं. रंग रंगोटी करायची. मस्त झुला घालायला दयायचा. गळ्यात गुंगरू माळ, गळ्यात पट्टा. काय काय खेळ सजवायला. व्यवस्थित असं बैलाला वाटले पाहिजे की आपला मालक किती चांगला आहे. किती काळजी घेतो आपली. मालक असुन आपली अंघोळ घालतो. छान सजवतो किती काळजी घेतो. जिव्हाळा लावतो खायला चारा देतो. एक दिवस त्याच्या नावानं सण करतो. सारा गाव मस्त वाजत गाजत मिरवणूक काढत असतो बैलाची. बैल मुळे मी शेती करतो पोट भरतो. अन्न धान्य पिकवतो. त्याची पूजा अर्चना करतो . असं दाखवतो की मी किती चांगला आहे.बैल पशु त्याच्या ह्या नुसतं गोड बोलणं, वागणं, गोड खाऊ घालणे, सजवणे, वाजत गाजत मिरवणूक काढणं, त्याच्या नावानं सण करणं. ह्या अश्याच फसव्या वागण्याला बैल वर्षोनं वर्ष फसलाय बिचारा बैल. त्याचं शोषण करतोय मालक समजतंच नाही त्याला. त्याच्या साऱ्या भावना मारून स्वतः जगण्यासाठी त्याला औताला जुपतोय. हे झालं शेतकरीचं दृष्ट वागणं. त्यांच पाप आज भरताना शेतकरी मला दिसतोय. 

               बैल पशु याला शेतकरी खुप वाईट वागणूक देत आलाय.त्याची परतफेड होताना आज दिसतेय. पृथ्वी वरील माणसातील व्यापारी, पुढारी, नोकरदार, आपलं भोळं सरकार अगदी तसंच वागतंय.  शेतकरी सुद्धा एक बैल समजून घेतलाय या साऱ्यांनी. नुसता आव आणायचा आम्ही तुमचे कैवारी. त्याला नुसतं राबवायचं पिकवायला ठेवलाय बैल मित्र  शेतकरी. ज्याचा मित्र बैल तो पण बैल. असंच समजतेय हि सारी दुनिया.  त्यांच रक्त काढणारे सारेच तयार झालेत. रोज आरीचा घोदा देताय सारे. त्याच्या मालाला भाव नाही. दुनियेला फुकट खायला पाहिजे. म्हणून याला मारा झोडा कामाला लावा त्याच्या कडून फुकट घ्या. तो मेला तर मरू दया त्याच्या संसार उध्वस्त होताय तर होऊ दया. त्याच्या भावना सुद्धा मारा. बिनकामी राबणारा बैल करा अन वरून भीक म्हणून भिकाऱ्याला पाचशे रुपये महिना दया किंवा त्यानेच पिकवलेले धान्य फुकट दया त्यालाच. फुकटात त्याच्याकडून विकत घ्या वरून त्यालाच भिकारी बनवलं म्हणून भिकाऱ्याला भीक म्हणून फुकट दया. भिकारी खुश. मालक किती चांगला आहे. आपली काळजी घेतो.  मरू देऊ नका त्याला. पार हडकुडा केलाय शेतकरी. त्याला आशा लावली जातेय. त्याच्यावर जग चालतंय तुच अन्नदाता आहेस  आमचा. तुच दुनिया जगवतोय. असं गोड भावनिक गाजर दाखवतं. नुसतं आशेवर  आशा दाखवतं शेतकरी लुटायचं धोरण आज सर्वीकडे दिसतंय. रोज शेतकरी फासावर जातोय तर जाऊ दया दुसरा भिकारी तयार करा शेती करायला. बैलाला राबवण्याची परतफेड होतेय दुनियेत बैल म्हणून गणना होतेय शेतकऱ्याची. वरून अन्नदाता हि पदवी दयायची. अन्नदाता म्हटलं की बैल खुश अजून राबण्यासाठी.  तो जसं वागतोय बैला सोबत अगदी तशीच दुनिया त्याला वेडं करतं राबवत आहे. सर्व विसरलाय बैला सारखं शेतकरी. हक्क मागणी लढणं.  दुनियेला स्वस्त पाहिजे. पिकवणारा मरो पण दुनिया जगो.  

          पण सांगतो बैलाला राबवण्याचे शाप जसं शेतकऱ्यांना लागतात. अगदी तसेच शाप फासावर रोज चढणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं फुकट घेणाऱ्यांना लागतील.  तो दिवस दुर नाही शेतकरी आपलं हातात बांडक (काठी) घेऊन सुटेल. त्याला पाहुन सरकार, सरकार चालवणारे, त्यानेंच निवडून दिलेले सरकार म्हणजे आम्ही तुमचे मालक स्वतःला समजणारे आणि व्यापारी, नोकरदार पुढं पळतील यांना मारायला शेतकरी पळेल. किंवा  शेतकरी स्वतः मरतील सारं जग पण संपलेलं आपल्याला दिसेल. "नाही शेतकरी राहिला तुम्हाला काय मिळेल खायला" 

मग बसा शेतकऱ्याला लुटून कमवलेलं धन खात बसा. 

सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो मी पण तुमच्यातला एक . आपली अवस्था बैला सारखी केलीय सरकारी धोरणांनी.  शेती करून सारखं राबत. इतरांना फुकट  पोसण्या पेक्षा  काय करावं हा उपाय आता स्वतः ठरवावा?

सरकार, सरकारी अधिकारी, जनतेनं निवडून दिलेले स्वतःला जनसेवक म्हणवणारी पुढारी यांनी लेख, वाचुन बोध घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय दयावा. 



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने