छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवाडा बाबतची प्रथम टप्पा फलश्रुती*




 *छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवाडा बाबतची प्रथम टप्पा फलश्रुती* 


शिरपूर -  महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दिनांक १७/९/२०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक ०२/१०/२०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे


त्यानुसार दिनांक १७/०९/२०२५ ते २२/०९/२०२५ या पहिल्या टप्प्यामध्ये शिरपूर तालुक्यात " पाणंद रस्तेविषयक मोहिम" हा उपक्रम राबविण्यात आला तो खालीलप्रमाणे


 सदर अभियानातंर्गत निस्तार पत्रक / वाजिब उल अर्जामध्ये एकूण ५२ नोंदी घेण्यात वहिवाट रस्ता अदालत एकूण १० आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच सदर अभियानातंर्गत एकूण ५५२ रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शिरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये शेतावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासंदर्भात ४८ संमतीपत्र प्राप्त झाले, सदर अभियानातंर्गत भूमी अभिलेख विभागामार्फत सुमारे ८ शेतरस्त्यांवी मोजणी व सीमाकंन करण्यात आले


दिनांक २९ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार रस्त्यांचे वर्गीकरण करुन प्रपत्र -१ आणि प्रपत्र २ मध्ये एकूण ५५२ नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर रस्त्यांना शासन निर्णयानुसार विशिष्ट सांकेतांक निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.


तसेच सेवा पंधरवाडा अंतर्गत उर्वरित दोन टप्प्यामधील कार्यवाही देखील यशस्वीपणे पार पाडणेच्या दृष्टीने शिरपूर तालुक्यात नियोजन करणेत आले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने