मध्य रेल्वेच्या नागपूर मडगांव रेल्वेगाडीला थांबा सुरु करण्याची विदर्भ खान्देश येथील खासदार केंद्रीयमंत्री रेल्वे विभागाला निवेदन



 मध्य रेल्वेच्या  नागपूर मडगांव रेल्वेगाडीला  थांबा सुरु करण्याची विदर्भ खान्देश येथील खासदार केंद्रीयमंत्री रेल्वे विभागाला निवेदन


 विदर्भ,खान्देश प्रांत ते कोकण प्रांतातून येणारा फळ,फुल,शेतीमालाला या नागपूर मडगांव रेल्वेमुळे प्राधान्य मिळेल-श्री.वैभव बहुतूले


विदर्भ-खान्देश-कोकण प्रतिनीधी:- विदर्भ खान्देशातील नागरिकांना कोकण प्रांतात जाण्यासाठी भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर कडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेली विशेष रेल्वेगाडी क्र.०११३९/४० नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी व चांदुर,मूर्तीजापूर,नांदुरा,बोदवड,पाचोरा,चाळीसगाव,मनमाड,पेण अतिरिक्त थांबा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी(रजि.) संस्थेचे मध्य कोकण रेल्वे अभ्यासक तथा विदर्भ खान्देश मराठवाडा संपर्कप्रमुख प्रांतप्रमुख श्री.वैभव बहुतूले यांनी विदर्भ-खान्देश-कोकणातील माननीय केंद्रीयमंत्री,विदर्भ खान्देश खासदार महोदयांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

                        माननीय केंद्रीयमंत्री, खासदार महोदयांना पाठवलेल्य पत्रात नमूद केले आहे की,चंद्रपूर येथील महाकाली मंदिर,वर्धा सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम,नागपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी,अमरावती येथील मोझरी संत तुकडोजी व गाडगेबाबा यांचे स्मारक,मूर्तीजापूर जवळील कारंजा(ला)येथील दत्त मंदिर,नागझरी येथील गोमाजी महाराज मठ,शेगांव येथील विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री गजानन महाराज मंदिर शितला माता मंदिर बंकटलाल सदन कृष्णाजींचा मळा महालक्ष्मी मंदिर,सिंधखेडराजा येथील माँ जिजाऊ यांचे जन्मगाव,नांदुरा येथील १०५ फुटी उभी हनुमानाची मुर्ती,अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड जंक्शन जवळील श्री.साई बाबा संस्थान शिर्डी,नाशिक येथील त्र्यंबकेश्वर,कोकणातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वर मंदिर,कणकवली येथील भालचंद्र महाराज,मालवण येथील भराडी मंदिर,वेंगुर्ले येथील सातेरी मंदिर,सावंतवाडी येथील लाकडी खेळण्यांचे बाजारपेठ अनेक भाविक भक्त कोकणातून खान्देश विदर्भात व विदर्भ खान्देशातून कोकण प्रांतात धार्मिक स्थळांना दर्शनाकरीता ये-जा करीत असतात.गोंदिया-बल्हारशाह कोकण रेल्वेमार्गे मडगांव तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी(रजि.) संस्थेकडून वारंवार केली जात आहे.

                              भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर कडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेली विशेष रेल्वेगाडी क्र.०११३९/४० नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेस तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी व चांदुर,मूर्तीजापूर,नांदुरा,बोदवड,पाचोरा,चाळीसगाव,मनमाड,पेण  अतिरिक्त थांबा सुरु करण्याची मागणीची दखल घेऊन स्पेशल दर्जा काढून तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपीचा दर्जा प्राप्त करून देण्यात आल्यास विदर्भातील नागपूर अमरावती वर्धा येथील संत्री,मूर्तीजापूर येथील सीताफळ,शेगांव येथील प्रसिद्ध कचोरी,जळगाव येथील केळी लाल मिरची,नाशिक येथील द्राक्ष,संगमनेर येथील डाळिंब,रायगड जिल्ह्यातील पांढरा कांदा,पापड लोणची, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील हापूस आंबा आंबा पोळी आमरस फणसपोळी काजूगर कडक बुंदी लाडू मालवणी खाजा इत्यादींचा स्वाद रेल्वेसेवेमुळे कोकण खान्देश विदर्भातील नागरिकांना घेता येईल.गोंदिया-बल्हारशाह  कोकण रेल्वेमार्गे मडगांव तृतीय साप्ताहिक रेल्वेसेवा व चांदुर,मूर्तीजापूर,नांदुरा,बोदवड,पाचोरा,चाळीसगाव,मनमाड,पेण अतिरिक्त थांबा सुरु केल्याने शेतमालाची आयात निर्यातीमुळे बाजाराला उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे.कोकण खान्देश विदर्भातील आयात निर्यात झाल्याने बेरोजगार तरुण युवक-युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.गोंदिया-बल्हारशाह मडगांव या रेल्वेसेवेमुळे मध्य रेल्वे प्रशासनाला मोठ्य प्रमाणात राजस्व प्राप्त होऊ शकेल.रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी(रजि)संस्थेचे रेल्वे अभ्यासक तथा विदर्भ खान्देश संपर्क-प्रांतप्रमुख श्री.वैभव बहुतूले यांनी केलेल्या मागणीनुसार निवेदनाच्या प्रति मा.श्री.नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार,अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार, व्ही सोमण्णा, रवनीत सिंग केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार,नितीन गडकरी केंद्रीय परिवहनमंत्री तथा नागपूर खासदार,मा अध्यक्ष रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,महाप्रबंधक-विभागीय रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे विभागाला तसेच विदर्भ खान्देश खासदार महोदयांना पाठवण्यात आलेल्या आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने