महसूल सप्ताहात शिवराज्याच्या प्रेरणेतून समाधान शिबिर" — नागरिकांच्या दारात दाखले, योजनांचा लाभ!"
शिरपूर (प्रतिनिधी) | 4 ऑगस्ट 2025
राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. या अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे व सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश राहिला.
या शिबिरात जिवंत सातबारा मोहिम, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड सुधारणा, प्रलंबित फेरफार नोंदी, विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले इत्यादी महसूल विभागाच्या सेवांचा नागरिकांना थेट लाभ देण्यात आला.
होळनांथे मंडळात एकूण 163 व एकट्या होळनांथे साजेमधून 45 सातबाऱ्यावर जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली असून ती तालुक्यात सर्वांत जास्त होळनांथे मंडळात ही योजना राबवलेली गेली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शरद मंडलिक (उपविभागीय अधिकारी, शिरपूर विभाग) होते.
त्यांच्यासोबत मा. तहसीलदार महेंद्र माळी, जि.प. सदस्य संजय पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष के.डी. पाटील, तसेच सर्व पंचक्रोशीतील सरपंच मंडळींची उपस्थिती लाभली.
प्रशासनातील मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते:श्रीमती वैशाली गिरासे – मंडळ अधिकारी, होळनांथे
जयेश भटू साळुंके – तलाठी, होळनांथे
अमित शिरसाठ – तलाठी, पिळोदा
दिनेश गुसिंगे – तलाठी, भाटपुरे
रजनीकांत कांगुणे – तलाठी, बाभळाज
या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महसूल विभागाच्या योजनांचा लाभ घेतला. "सुगम सेवा – नागरिकांच्या दारात" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे हे शिबिर ग्रामस्थांनी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. शिरपूर महसूल प्रशासनाचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.