पत्रकार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव

 



पत्रकार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव 

 शिरपूर /प्रतिनिधी 

     पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यातर्फे शैक्षणिक वर्ष २००२४/२५  मध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

                खर्दे तालुका शिरपूर येथील श्री लक्ष्मी लॉन्स येथे दिनांक २४ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तरी विशेष प्राविण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नाव भरत बाजीराव रोकडे (सुभाष कॉलनी,शिरपूर), जितेंद्र विजय शेटे (बुक स्टॉल, बस स्टँड, शिरपूर), विजय अमृतराव चव्हाण (दहिवद), पेंटर रवीप्रकाश भावसार (भवानी टेक, शिरपूर), विजय शांताराम शुक्ल (शिरपूर), योगेश नारायण पाटील (जोगेश्वरी एजन्सी, बस स्टॅन्ड, होळनांथे) यांच्याकडे नोंदण्याचे आव्हान संघाचे अध्यक्ष युवराज राजपूत,  संस्थापक अध्यक्ष चंद्रवदन गुजराती, संचालक दिलीप पाटील, संचालक संतोष भोई,  शिरपूर शहर अध्यक्ष मयूर वैद्य, उपाध्यक्ष अनिल वाघ, तालुका अध्यक्ष प्रवीण शर्मा, संचालक गोकुळ महाले, जयपाल चौधरी, अनिल वाघ, ज्येष्ठ सल्लागार भरत पगारिया तालुका  प्रसिद्धी प्रमुख रोहित भावसार, सहप्रसिद्धी प्रमुख  जगदीश सोनवणे यांनी केले आहे. तरी गुणवंत विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान पत्रकार सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने