शिरपूर पंचायत समितीवरचे आरोप निराधार; गटविकास अधिकाऱ्यांचा खंडनात्मक खुलासा

 


"शिरपूर पंचायत समितीवरचे आरोप निराधार; गटविकास अधिकाऱ्यांचा खंडनात्मक खुलासा


(जि. मा.का. धुळे - ) स्थानिक वृत्तपत्रांमधून शिरपूर पंचायत समिती व गटविकास अधिकारी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून याबाबतच्या खंडनात्मक खुलासा गटविकास अधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय धुळे यांच्यामार्फत प्रसिद्धी दिला आहे.


शिरपूर तालुक्यातील स्थानिक वृत्तपत्रात "पैशासाठी गट विकास अधिका-यांकडुन कर्मचा-यांचा छळ, मुख्य कार्यंका-यांना निवेदन , कारवाईची मागणी " शिरपुर पंचायत समितीमध्ये पैसा बोलतोय ? या मथळयाचे वृत्त  प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र सदरचे वृत्त हे कर्मचारी संघटनांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारावर जरी देण्यात आले असले तरी हे वृत्त पूर्णत: निराधार ,तथ्यहीन , खोडसाळपणाचे व निखालस खोटे असून प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा रचलेला कट आहे .

वृत्तपत्रातील बातमीनुसार गटविकास अधिकारी प्रदीप पवार हे ग्रामसेवकांकडून तालुका अंतर्गत बदलीसाठी ५-५ लाख रुपये घेत असल्याचे नमुद केले आहे. या वृत्ताची दखल घेऊन शिरपूर तालुका ग्रामसेवक संघटनेने दिनांक २०/०८२०२५

रोजीच्या निवेदनानुसार निषेध व्यक्त केला आहे. तसे निवेदन महाराष्ट्रा  राज्य ग्रामसेवक युनियन शाखा शिरपुर यांनी प्रशासनास दिनांक २०/०८/२०२५ रोजी सादर केलेले आहे.


शिवाय  महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेमार्फत निवेदन दिले बाबतचा आशय आहे. सदर वृत्तात पशुवैद्यक संघटनेच्या निवेदनात शासन निर्णय दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ नुसार तांत्रिक बाबी तपासण्याचा गट विकास अधिकारी यांना कुठलाही अधिकार नसल्याचा नमुद केले आहे. मात्र शासन  शासन निर्णय दिनांक १०ऑक्टोबर, २०२४ चे अवलोकन होणेस विनंती.सदर शासन निर्णय हा पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय विमागाची पुनर्वचना व आकृतीबंधाबाबत मार्गदर्शक सुचना संदभांतील आहे.या निर्णयातील मुद्या क्र.१० व मुद्य क्.७ अन्वये पशु वैद्यकीय संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणणेत आल्या आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधिल कलम ९८ मध्ये गट विकास अधिका-याचे अधिकार व कार्य नमुद केले आह., त्याअनुषगांने कलम ९८ १ (ब) मध्ये नमुद केल्यानुसार"अशा कोणत्याही अधिका-याकडुन किंवा कर्मंचा-याकडुन कोणतीही माहिती, विवरण, विवरणपत्र, हिशेब,अहवाल, किंवा स्पष्टीकरण मागविता येईल" अशी तरतुद आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांना अधिकार नाहीत असा आरोप निराधार आहे.


मी दिनाक ०२/०७/२०२५ रोजी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ जातोडा ता.शिरपुर येथे भेट दिली.

सदर भेटीत आढलेल्या अनियमितता वस्तुस्थिती मी शेरा बुकात नॉंदल्या आहेत. मी दिनांक २६/०७२०२५

रोजी पशुवेद्यकीय दवाखाना श्रेणी १ वाडी ता.शिरपुर येथे मेट दिली. सदर भेटीत मला मुदतबाहय ओषधे आढळुन आली., सदर ओषधांचा मी रितसर पंचनामा करुन घेतला आहे. मी थाळनेर व गरताड येथेही भेटी,

दिलेल्या आहेत. माइया भेटीत सदर पशुवद्यकीय दवाखाने बंद आढळुन आले, मी पश् वैद्यकीय दवाखान्यातील अनियमितते बाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस उक्त अधिकाराच्या अधिन राहुन बजावल्या आहेत,संबंधितांचे खुलासे मागविण्यात आले आहे. ६ पैकी २ खुलासे प्राप्त झाले आहेत. उवरीत अद्याप अप्राप्त आहेत.


शिरपर तालुक्यातील एकही पशुधन वैद्यकीय अंधिकारी मुख्यालयी राहत नाही. सदर बाब तपासणी करुन तसा अहवाल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे.

निवेदनात पशुवैद्यक संघटनेने गट विकास अधिकारी हे पैशांची मागणी करतात असा आरोप केला

आहे. सदर आरोप त्यांचे विरुध्द केलेल्या कारवाईच्या भितीपोटी निखालास खोटे आरोप केले आहेत.


 संघटनेचे सवं सदस्य हे उच्च शिक्षीत आहेत. त्यांन या संदभांत करावाच्या कार्यवाहीचे पर्ण जाणीव व ज्ञान आहे. संघटना अथवा अधिकारी कर्मचारी सक्षम प्राधिकरण किवा तत्सम यंत्रणा यांचेकडे तक्रार व दाद मागु शकत होते. प्रत्यक्षात तसे काही नसल्याने त्यांनी निराधार आरोप करुन प्रशासनासह शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा विचारपूर्वक प्रयत्न केला आहे.


 शिरपुर तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी सर्व सामान्य नागरिकांना देत असलेल्या सेवांची विमागीय स्तरावरुन चौकशी झाली पाहिजे, शिरपुर तालुक्यातील आदिवासी , गरीब जनतेस वेठीस

धरणेचा काम पशुधन विकास अधिकारी हे करीत असल्याचा  बाब देखील तपासणी समोर आली आहे.


मी,पशुवेद्यकीय दवाखान्यासह , प्राथमिक आरोग्य केंद्, उपकेंद्, जिल्हा परिषद शाळा, पंचायत समिती

अंतर्गत विकास कामे, इ.ठिकाणी नियमित भेटीत देत आहे. अनियमितता आढळल्यास अधिका-यांसह

कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. पंचायत समिती अंतर्गंत काही अबिकारी वर्ग १ मधिल आहे. काही अधिकारी आम्ही वर्ग१, गट विकास अधिकारी वर्ग १ अधिकारी आहेत, आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करणार नाहीत. असे स्पष्टपणे म्हणत आहेत. सदर बाब देखिल गंभीर आहे. अधिका-यांनात्यांच्या जबाबदारीची जाणीव केल्यास मनात राग धरतात. काही अधिका-याच्या आकसापोटी अश्या वृ्तपत्रातील वृत्तनुसार प्रशासनाची जनमानसात प्रतिमा मलिन होत आहे.या मुळे कर्तव्याचे पालन करण्यास अडचणी निर्मांण करीत आहेत,


ग्राम पंचायत भोरटेक येथील गोठा व रस्ता अनियमितताबाबत वेळोवेळी अहवाल जिल्हा

प्रशासनास सादर करण्यात आलेला आहे. याबाबत स्वप्नील जाधव रा.भोरटेक यांना सर्वं वस्तुस्थिती

समजावुन सांगण्यात आली होती. जाधव यांना आत्मदहनाच्या नोटीसनुसार त्यांना आत्मदहनापासुन परावृत करण्याचा प्रयत्न प्रशसनाने सातत्याने केलेला होता. त्यास जाधव हे सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते

आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलीसांनी त्यांचे विरुष्द गुन्हा दाखल केलोाल आहे.सदर प्रकरणी जिल्हा

प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार उचित कार्यवाही करणेत येईल. श्री.स्वपनील जाधव रा.भोरटेक हे प्रशासनावर निराधार व खोटे आरोप करुन ,दबाव आणुन चुकीचे कामे करण्यास प्रवृत्त करीत आहेत,


मी पंचायत समिती शिरपुर थेये कार्यरत कालावधीत शिरपुर तालुक्याचा विकासाचा ध्यास घेतलेला

आहे. माझ्या कामामुळे गोर गरीब, आदिवासी , मागसवर्गीय, व्यथीत जनतेस तत्परतेने कसा न्याय देता येईल यांचा मी कसोसीने प्रयत्न करीत आलो आहे. 


धुळे जिल्ह्यातील माइया कार्यकाळात माझी वसुंधरा अभियांनातर्गत ग्राम पंचायत बोराडी यांना

आजपयंत सव्वा तीन करोड रुपयाचे बक्षीस शासनाकडुन मिळाले आहे. तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपुर म्हणुन काम करीत असतांना ग्राम पंचायत रोहिणीe- -goverance उपक्रमात देशात प्रथम आलेली आहे. 

धरती आभा या केंद्र शासनाच्या उपक्रमात शिरपुर तालुका महाराष्ट्रा प्रथम क्रमांकावर आला होता. 


शिरपुर तालुक्यात गुणवत्तपुर्ण शिक्षण , आरोग्य, पशुसेवा, स्वच्छता, पर्यावरण पूरक उपक्रम, घरकुल

योजना या सारख्या अनेक लोकाभिमुख सेवा शिरपर तालुक्यातील जनतेस विनासायास व स्थानिक ठिकाणी मिळणेसाठी  पारदर्शक प्रयत्न कार्यरत असतांना काही कामचुकार व अप्रामाणिक

लोकांनी विचारपुर्वक षडं यंत्र रचुन मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे.


अश्या प्रकारच्या कामाची प्रामाणिक दखल शिरपुर तालुक्यातील जनता व सन्मा.लोकप्रतिनिधी, आणि या तालुक्यातील सुज्ञ माध्यम निश्चित घेतील याची खात्री आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने