धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मित्र मंडळ दोंडाईचा तर्फ भव्य रक्तदान शिबिर*

 



*धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मित्र मंडळ दोंडाईचा तर्फ भव्य रक्तदान शिबिर* 


दोंडाईचा प्रतिनिधी  (दि.28):गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी सामाजिक जाणीव जोपासण्यासाठी आणि गरजू रुग्णांच्या रक्तांची गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात याच संकल्पनेतून धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव मित्र मंडळ दोंडाईचा ( डाबरी घरकुल ) आज २८ रोजी 

 भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी धर्मवीर संभाजीराजे गणेश मित्र मंडळाचे संस्थापक युवराज पैलवान धर्मवीर संभाजी राजे गणेश मित्र मंडळाचे आधारस्तंभ मा.विजू बापू पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष विक्की भाऊ कोळी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराची उद्घाटन करण्यात आले.


सेवा ब्लड सेंटर नंदुरबार रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलनाचे काम केले यावेळी रक्तदांत्यांना फिल्टर पाण्याचा जार व प्रमाणपत्र भेट वस्तू म्हणून देण्यात आली. दुपार पर्यंत 32 रक्तदान झाले होते याप्रसंगी पांडुरंग बहुउद्देशीय संस्थाच्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.पुजाताई खडसे,दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.हितेंद्र भाऊ महाले,माजी बांधकाम सभापती मा.निखिल राजपूत ,नरेंद्र कोळी ,नरेंद्र गिरासे,विजय मराठे, चिरंजीवी चौधरी,सामाजिक कार्यकर्ता जे.डी., निलेश महाले या मान्यवरांच्या हस्ते अगोदर गणरायाची आरती करून रक्तदात्यांना फिल्टर पाण्याचे जार व प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक गणेशोत्सव मंडळे देखावे आणि डिजेवर अवाजवी खर्च करतात परंतु रक्तदान शिबिराचे आयोजन करून धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळाने लोकांमध्ये रक्तदानाची प्रेरणा वाढण्यात मोठे योगदान दिले आहे गणेशोत्सव काळात आयोजित रक्तदान शिबीरांमुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या पुरवठा वाढतो ज्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी रक्त उपलब्ध होते. रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विक्की कोळी, उपाध्यक्ष ऋषीकेश मराठे अनमोल सहकार्य राहुल सुराणा, किरण पाटील ,विशाल पाटील ,शेखर कोळी,समाधान गिरासे ,तुषार पाटील, विकास पाटील ,भूषण कोळी ,सागर मराठे,आकाश पाटील ,मयूर सोनवणे ,ऋषिकेश चौधरी, गोलू धनगर ,आनंद धोबी भूषण पारधी, दुर्गेश चौधरी, चेतन पाटील ,अक्षय पाटील जितेंद्र पाटील, राकेश सोनवणे मयूर कोळी, कमलेश कोळी व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने