भारतीय इतिहासाच्या गौरवगाथेचा अभ्यास शिरपूरमध्ये; संघाच्या बौद्धिक वर्गास उपस्थितीचे आवाहन



  "भारतीय इतिहासाच्या गौरवगाथेचा अभ्यास शिरपूरमध्ये; संघाच्या बौद्धिक वर्गास उपस्थितीचे आवाहन


शिरपूर (ता. प्रतिनिधी) –राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिरपूर तालुका यांच्या वतीने संघ स्वयंसेवक व कार्यकर्त्यांच्या बौद्धिक विकासासाठी आयोजित मासिक बौद्धिक वर्गाला  सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.हा वर्ग दिनांक २५ जुलै २०२५ रोजी, शुक्रवार संध्याकाळी ६.३० वाजता बाबुराव वैद्य मार्केट येथील संघ कार्यालयात पार पडणार आहे.या वेळी “भारतीय इतिहासाची वैभवशाली व गौरवशाली परंपरा” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या बौद्धिक वर्गासाठी इतिहास अभ्यासक व धुळे जिल्हा बौद्धिक मंडळाचे सदस्य श्री जयपालसिंहजी गिरासे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. ते आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून भारताच्या ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक वारसा, आणि पराक्रमी पूर्वजांच्या शौर्यगाथा प्रभावी पद्धतीने मांडणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन तालुका बौद्धिक प्रमुख यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.तरी सर्व स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी सदर वर्गात उपस्थित राहावे ही अशी विनंती करण्यात आली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने