गावातील शेत रस्त्यांमध्ये पाणद रस्ता अभियान राबवा;* *ग्रामविकास अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे पोलीस पाटील व क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची निवेदनाद्वारे मागणी*

 


*गावातील शेत रस्त्यांमध्ये पाणद रस्ता अभियान राबवा;*

*ग्रामविकास अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे पोलीस पाटील व क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची निवेदनाद्वारे मागणी*

शिरपूर तालुक्यातील आढे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी राजश्री पाटील यांना पोलीस पाटील तथा क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष राजकिरण राजपूत यांनी  गावातील शेत रस्त्यांमध्ये शासनाचे पाणद रस्ता अभियान योजनेचा लाभ देण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदनात असे कि,गावातील शेत शिवारातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे.शेतातील शेती उपयोगी साहित्य व निविष्ठा आणणे आणि  पाठविणे अडचणीचे झालेले आहे.यासाठी पावसाळ्यापूर्वी पाणद रस्ता अभियान योजनेचा लाभ मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.आणि सोयीचे होईल.याकरिता योजनेचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवा अशी मागणी पोलीस पाटील तथा क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेचा वतीने करण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने