शिरपूर शहरात 14 जूनला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर* *महाराणा प्रताप राजपूत समाज संस्थेचा स्तृत्य उपक्रम*

 


*शिरपूर शहरात 14 जूनला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर*


*महाराणा प्रताप राजपूत समाज संस्थेचा स्तृत्य उपक्रम*


प्रतिनिधी | शिरपूर


येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) व केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) स्पर्धा परीक्षासाठी इच्छुक युवक युवतींसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षाची तयारी कशी करावी, पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्तीसाठी काय काय करावे, चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे, मागील प्रश्नपत्रिका सोडवणे, मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे, पुरेसा आराम करणे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे इ. महत्वाच्या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.


14 जूनला सकाळी 8:30 वा पासून स्व. इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल (राजपूत भवन) वरझडी रोड, दादुसिंग कॉलनी, शिरपूर येथे शिबिरास सुरुवात होईल. शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथील सिव्हिल आयएएस चे फॉउंडर श्री. अभिनवसिंह राजपूत, अहमदाबाद येथील श्री. किरणसिंह सिसोदिया लाभले आहेत. तसेच युवकांना महत्वाच्या टिप्स देण्यासाठी शहादा तहसिलदार श्री दिनेश गिरासे, शिरपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री योगेश गिरासे, मुंबई पोलीस दलात कार्यरत पीएसआय श्री स्वप्निल गिरासे लाभणार आहेत. तसेच या शिबिरासाठी अनमोल सहकार्य करणारे मुंबई येथील उद्योजक, ज्यांनी अनाथ आश्रमात शिक्षण घेऊन मुंबई येथे स्वतःची कंपनी स्थापन करून आज अनेक युवकांना रोजगार देत आहेत ते थाळनेर येथील युवा उद्योजक श्री धनराज राजपूत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. 


शिबिरासाठी नावनोंदणी सुरू झाली असून शिरपूर येथील संजिवनी कॉम्प्युटर - इंदिरा हॉस्पीटल शॉपिंग, ओमकार मेडिकल, राज पॅलेस - करवंद नाका, आई पेडकाई झेरॉक्स - करवंद नाका, साई संस्कृती पार्सल हॉऊस - निमझरी-शहादा रोड व साई मोबाईल - गुजराथी कॉम्प्लेक्स समोर, शिरपूर येथे नोंदवावीत किंवा व्हाट्सअँप क्रमांक 7498981950, 9850279222, 8007950695 वरही आपले नावे नोंदवू शकता.


तरी युवक-युवतींनी आपल्या पालकांसोबत उपस्थित राहुन मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था, शिरपूर चे अध्यक्ष श्री. संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत, उपाध्यक्ष श्री. योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया, व्यवस्थापक श्री. प्रविणसिंग बाबुसिंग राजपूत व विश्वस्त मंडळाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने