पोलीस पाटीलाचा लाचखोरीचा खेळ उघड! दोन हजारांची रक्कम घेताना रंगेहात पकडला
धुळे : बळसाणे (ता. साक्री) येथील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार हे बळसाणे गावचे रहिवासी असून, त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस पाटील यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 8,000 रुपयांवर आली होती.
दिनांक 6 मे 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी सापळा रचून पहिला हप्ता म्हणून घेतलेले 2,000 रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना पोलीस पाटील आनंदा भटा पाटील याला रंगेहात अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत लाचेची रक्कम मिळून आली असून, त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. उपविभागीय अधिकारी, साक्री यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले, तर तपास व पर्यवेक्षणाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांनी पार पाडली.
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताचा जोरदार हल्ला: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला
https://www.blogger.com/blog/post/edit/3912360404909106936/8801811835607833688
कारवाई पथकात पो. हवा. राजन कदम, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, व प्रविण पाटील यांचा समावेश होता.
या संपूर्ण कारवाईस ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्राच्या मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
हा प्रकार उघडकीस आल्याने गावपातळीवरील पोलीस यंत्रणांवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असून, अशा भ्रष्ट अधिकार्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती;
चार आठवड्यांत अधिसूचना आणि चार महिन्यांत निवडणुका घ्या, ओबीसी आरक्षण २०२२ पूर्वीच्या पातळीवरच
https://www.blogger.com/blog/post/edit/3912360404909106936/7676689782478458809
