शाळेने पालकांवर केलेल्या अन्याया विरोधात आज 1 मे रोजी हजारो कामगार पालकांचा शाळेत व पोलीस स्टेशनं मध्ये ठिय्या आंदोलन.

 


नाशिक - शाळेने पालकांवर केलेल्या अन्याया विरोधात आज 1 मे रोजी हजारो कामगार पालकांचा शाळेत व पोलीस स्टेशनं मध्ये ठिय्या आंदोलन.


मराठा विद्या प्रसारक संस्थेची अभिनव बाल विकास मंदीर सिडको, नाशिक या शाळेत आज मुलांचा निकालपत्र वाटप होते परंतु ज्या पालकांनी शाळेची फी भरलेली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे निकालपत्र शाळेने अडवून ठेवलेत. ही शाळा 100% खाजगी अनुदानित शाळा आहे. तरी ही शाळा व संस्था प्रशासन पालकांकडून बेकायदेशीर पणे 7500 रुपये फी वसुल करीत आहे, या संधर्भात पालक गेल्या 2 वर्षांपासून लढा देत आहेत शिक्षण विभागाने आदेश दिलेले आहेत अनुदानित शाळेत पालकांकडून फी वसुल करता येणार नाही, मागील आठोड्यात शिक्षण उपसंचालक चव्हाण साहेब यांनी चौकशी समिती गठीत केली होती त्या चौकशी समितीचे अध्यक्ष सौ. किरण कुवर धुळे शिक्षण अधिकारी हे होते यांनी शाळेच्या शेराबुक मध्ये स्पष्ट शब्दात लिहून मुख्याध्यपिका यांना कडक शब्दात सांगितले होते की शिक्षण हक्क कायद्यानुसार तुम्हाला एकही विद्यार्थ्यांचा निकालपत्रक / गुणपत्रक, शाळेचा दाखला अडवता येणार नाही, तसेच मुलांचे पुढील वर्षाचे प्रवेश तुम्हाला थांबवता येणार नाहीत हे शेराबुकात लिहले आहे, 

तरी ही आज पालकांना निकालपत्रक शाळा प्रशासनाने अडवून ठेवलेले आहेत, या विरोधात आज हजारो पालक शाळेत एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार, शाळेचा अधीक्षक काकळीज, संस्थेचे शिक्षण अधिकारी यांनी महिला पालकांना व पुरुष पालकांना अतिशय हीन व लाज्जस्पद शब्दात महिलांना लज्जा निर्माण होईल अश्या भाषेत सवांद साधला, पालकांनी याचा तीव्र निषेध केला म्हणून शाळा प्रशासनाने अंबड पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक हांडे व त्यांचे सहकारी यांना बोलून घेतले, पालकांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, शाळेतील मुख्याध्यापिका, व इतर स्टाफ संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या सांगण्यावरून पालकांना काही ही नं सांगता पालकांना निकाल नं देता निघून गेलेत, या संधर्भात शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांना पालकांनी फोन केला शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार व संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी चव्हाण सर यांचे फोनघेणे व फोनवरून बोलणे टाळले, 

शाळा व संस्था प्रशासन इतके भ्रस्ट झाले आहेत की ते शिक्षण उपसंचालक यांनाही जुमनात नाहीत तर ते पालकांवर किती अन्याय करीत असतील, शाळेने पालकांना न्याय दिला नाही म्हणून शाळेतील शेकडो महिला व पुरुष पालक शाळेतून थेट अंबड पोलीस स्टेशनं पर्यंत पाई चालत जाऊन अंबड स्टेशनं चे पोलीस निरीक्षक हांडे यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. शाळा प्रसासन पालकांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात आहेत, 

शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सर्व पालकांना आश्वासन दिले आहे येत्या 2-3 दिवसात वरिष्ठ पातळीवर स्वतः तक्रार करून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार आहेत. म्हणून पालकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचे ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे येत्या 1 जून पर्यंत शाळा व संस्था प्रशासनाने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व दाखले नं दिल्यास तसेच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात मोफत प्रवेश नं दिल्यास शाळा सुरु होईल त्याच पहिल्या दिवशी पुन्हा शेकडो पालक शाळेत येऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने