लोकनेते राहुल रंधे यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
शिरपूर प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कुवे गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करणे व मुस्लिम कबरस्थान मध्ये आवार भिंत बांधने या कामाचे भूमिपूजन भाजपा मा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.*
विकासरत्न आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुवे गावकरी व समाज बांधवांच्या मागणी नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणं व इतर सोयी सुविधा करणे १२लक्ष रुपये तसेच मुस्लिम कबरस्थान करिता आवार भिंत बांधणे या कामासाठी १० लक्ष रुपये निधी मा जिप अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या निधीतून या कामासाठी असे एकूण २२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला व त्या कामांचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, यापूर्वी देखील कुवे गांवात बहुतांशी विकास कामे झालेली आहेतच त्यामुळे नागरिकांमध्ये नेहमी आनंदाचा वातावरण असते. भूमिपूजन सोहळा झाल्या नंतर राहुल रंधे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून विविध समस्यांचे निराकारण केले.
या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून पंस सदस्य डॉ शशिकांत पाटील, अर्थे सरपंच मनोहर पाटील, बलकुवे सरपंच प्रदिप चव्हाण, अमोल शिरसाठ, राजू सूर्यवंशी, गजू पाटील, इंजि हर्षल देवरे, सुनिल पाटील आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन कुवे गावाचे सरपंच किसन पाटील, उपसरपंच कन्हीलाल कोळी, मा सरपंच पिंटू गुजर, डॉ गंगाराम पाटील, दिलीप राजपूत, प्रकाश पाटील, संजय कोळी, मधुकर निकुंभे, लोटन गवळे, प्रल्हाद भिल, विशाल गवळे, हर्षल गवळे, भरत निकुंभे, गणेश गवळे, रमजान पिंजारी, अन्वर पिंजारी, बालू पिंजारी, शकील पिंजारी, दिपक पाटील आदिनी नियोजन केले होते.

