डिजे साहित्य चोरीप्रकरणी टोळी जेरबंद; २.८० लाखांच्या साहित्याची पोलिसांकडून जप्ती




डिजे साहित्य चोरीप्रकरणी टोळी जेरबंद; २.८० लाखांच्या साहित्याची पोलिसांकडून जप्ती

धुळे, दि. १८ एप्रिल २०२५ – जिल्ह्यातील विविध भागांतून डिजे (DJ) साउंड सिस्टीम आणि त्यासंबंधित महागडं साहित्य चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत धुळे पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. १३ फेब्रुवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान रात्रीच्या सुमारास शिरढाने तालुका जिल्हा धुळे  येथून चोरीस गेलेले डिजे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, एकूण २,८०,००० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अटक आरोपींची नावे व गुन्हे

प्राथमिक तपासात पोलिसांनी आरोपी योगेश पंडित कोळी (रा. पश्चिम देवपूर, धुळे) याच्यावर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न केले आहे. याशिवाय तिघा अन्य आरोपींचाही तपास करून, त्यांच्याकडून डिजे साहित्य व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

आरोपी 1) संभाजी ऊर्फ समाधान रुपला ठाकरे, वय-26 वर्ष, रा.रामनगर, वडेल रोड
ता.जि.धुळे व 2) योगेश ऊर्फ सोनु पंडीत कोळी, वय-24 वर्ष, रा.साईबाबा मंदिराजवळ, नगांवबारी
देबपुर, धुळे यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर दोन फरार
साथीदार 3) धनराज सुरसिंग भिल व 4) देविदास आनंदा पवार दोन्ही राहणार मोराणे ता.जि.धुळे
यांचे मदतीने केल्याची कबुली देवुन, चोरी केलेला मुद्देमाल काढुन दिला. सदरचे गुन्हेगार हे सगळे त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यात देखील जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत एकूण जप्ती: ₹२,८०,०००/- रुपयांची  साहित्याचे करण्यात आली आहे.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरोक्षक श्रराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, असईं.संजय पाटील,
पोहेकॉ.संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, मुकेश वाध, शशीकांत देवरे, राहल गिरी, महेंद्र सपकाळ,विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी व हर्षल चौधरी, अशांनी केली आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या टोळीने अजून कुठे कुठे चोरी केली आहे याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या चोरीला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या परिसरातील संशयास्पद हालचाली तातडीने पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने