प्रा. शिवराम वसावे यांना पीएचडी पदवी प्रदान




प्रा. शिवराम वसावे यांना पीएचडी पदवी प्रदान 

शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एसपीडीएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवराम सेगजी वसावे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी "धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभाचा तुलनात्मक अभ्यास कालखंड २००७-२०१७" या विषयावर शोधप्रबंध सादर केले होते. त्यांना आरसी पटेल महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख, मा. उपप्राचार्य डॉ. ए. जी. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, उपप्राचार्य डॉ. डी. डी‌. भक्कड, डॉ. ए. एम. देशमुख तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने