महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन है बौद्द्यांच्या हाती देण्यात यावे , शिरपूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायांची मागणी
शिरपूर प्रतिनिधी - महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन है बौद्द्यांच्या हाती देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी, शिरपूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी यांनी शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी असे नमूद केले आहे की, युनेस्कोने आगतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या "महाबोधी महाविहार है नेहमी तथागत भगवान बुद्धांच्या जीवनाशी आणि विशेषतः ज्ञानप्राप्तीशी संबंधित चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. पहिले विहार सम्राट अशोकाने इ. स. पूर्व तिसन्या शतकात बांधले होते आणि सध्याचे विहार पाचव्या किंवा सहाव्या शतकातील आहे. हे गुप्त काळाच्या उत्तरार्धातील भारतात पूर्णपणे विटांनी बांधलेले, अजूनही उभे असलेले सर्वात प्राचीन बौद्ध विहार आहे." सध्या है मंदिर बौद्येत्तरांच्या ताब्यात असून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या अखत्यारीत यावे असे निवेदन आम्ही आपणास देत आहोत.
इतर मागण्या खालील प्रमाणे
• बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन अॅक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन है बौद्द्यांच्या हाती देण्यात यावे.
• बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरु असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात.
जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन अॅक्ट दुरुस्ती करावी अनेक दिवसापासून सुरु असलेल्या भिक्खू संघाच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. समस्त बौद्धांच्या भावनांचा आदर करून महाबोधी विहार बौद्द्येतरांपासुन मुक्त करावे. आपण आमच्या मागण्या असे शासनाचे प्रतिनिधी म्हणून शासनाकडे वरिष्ठ स्तरावर पाठवावे आणि याबाबत कारवाई करण्यासाठी पाठपुरा करावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाच्या इशारा देखील देण्यात आला आहे.
या निवेदनावर नगरसेवक गणेश सावळे, नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाठ, बाबुराव खैरनार, प्रताप सरदार,
रमेश वानखेडे, संदीप वाघ ,विशाल थोरात, गोविंदा खैरनार, गंभीर मंगळे ,राजवर्धन पवार, इत्यादी आंबेडकर अनुवादांच्या सह्या आहेत.