*वरवाडे गावातील जावाई माजी सैनिक नरेंद्र माळी यांचा सेवापुर्ती गौरव दिवस उत्साहात संपन्न*
शिरपुर— भारतीय सेना दल EME(इलेक्ट्राॅनिक मॅकनिकल इंजिनियर) नायक पदावरुन 22वर्षे सेवानिवृत्त झालेले धुळे अजंग रहिवाशी भदाणे परिवारातील माजी सैनिक नरेंद्र इंदर माळी हे आपली मातृभुमीचे रक्षण करत सेवानिवृत्त होवुन आपल्या गावी सुखरुप परत आले , त्या निमित्त भव्य दिव्य स्वागत सोहळा दी 1मार्च 2025 रोजी संपन्न झाला.अजंग येथील सुनंदाबाई इंदर भदाणे ,आणि वरवाडे शिरपूर वाघ परिवारातील कैलास भिका , राहुल (भैया) कैलास माळी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नरेंद्र भदाणे हे सुनंदाबाई इंदर भदाणे यांचे सुपुत्र असून कैलास भिका माळी यांचे जावई, व सौ.जयश्री नरेंद्र माळी यांचे पती आहेत .अजंग येथील मातोश्री सुनंदाबाई भदाणे नरेंद्र माळी यांचा सह माजी नरेंद्र इंदर भदाणे स प त्निक,ची.विर, रुची सह स्वागत वाहनात विराजमान होते, सेवापुर्ती गौरव दिवस म्हणुन दि.०१ मार्च २०२५ सायंकाळी ०६वा. शिरपुर शहरातील करवंद नाका महात्मा फुले सर्कल पासुन शिरपुर तालुका माजी सैनिक व विधवा पत्नी सैनिक संघटनासह सलामी देत ,भारत माता की जय नारा देत डीजे च्या तालावर देशभक्ती गीत गायन , भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. नातलग,मित्र परिवारासह करवंद नाका,बालाजी नगर ,प्रल्हादतात्या नगर परिसरात भारत माता की जय,जय जवान जय हिंद चा नारा देत मोठ्या उत्साहात रैली काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या निवासाजवळ भव्य स्वरूपात ऋणनिर्देश स्वागत सोहळा चे आयोजन करण्यात आले .नरेंद्र माळी यांनी त्यांच्या आईचे पुजन केले, तर सत्कारमूर्ती श्री नरेंद्र भदाणे यांचे औक्षण, पत्नी जयश्री, सासुबाई सौ. मंगलाबाई कैलास माळी,सौ. अंजली राहुल माळी यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित माजी सैनिक पदाधिकारी यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दीप प्रज्वलन ने करण्यात आले.सुरुवातीला देशभक्ती पर लहानशा चिमुकली कु.नेहा रविंद्र माळी सैनिका विषयी देशप्रेम बलिदान पर भाषण दिले .त्या नंतर या प्रसंगी माजी मुख्याध्यापक उत्तम बापु माळी सर, प्रा. डॉ.वासुदेव भिका माळी खापर, वर्षीकर आदर्श शिक्षक बापु वाल्हे यांनी सैनिका विषयी मनोगत व्यक्त करताना . देशाच्या रक्षणासाठी सैनिकांचे योगदान त्यांचे त्याग, समर्पण याचा आलेख मांडला, उपस्थित नागरिकांना कडून सर्व सैनिकांप्रती ऋणनिर्देश मांडलेत. शिरपुर वरवाडे माजी नगरसेवक दिपक माळी,शिरपुर वि.वि.कार्य.सहकारी सोसायटी चेअरमन संतोषभाऊ माळी,भटु माळी, गोपाल ठाकरे, पांडुरंग माळी, नितीन माळी, प्रविण माळी,योगेश माळी भीमराव माळी, गणेश चौधरी, नितीन सुरेश भदाने, गोपाल जगन्नाथ वाल्हे, योगेश माळी नंदूरबार, जितेंद्र माळी ,वसंत माळी उपस्थित होते चोपडा, आप्तेष्ट नातेवाईक ,गावातील प्रतिष्टीत मान्यवर तसेच या प्रसंगी शिरपुर तालुका माजी सैनिक संघटनातर्फे ,सर्व मान्यवरा हस्ते,मित्र परिवारातर्फे नरेंद्र माळी यांचा विशेष मान सन्मान करण्यात आला .व माजी सैनिक शिरपुर तालुका अध्यक्ष यांचा ही सन्मान करण्यात आला. भदाणे व वाघ परिवाराने ही विशेष सन्मान केला नरेंद्र माळी यांनी आपल्या जीवनात सैनिक नायक म्हणुन महाराष्ट्र,मध्यप्रदेश,हरियाणा पंजाब,जम्मु काश्मिर,लेह लद्दाक, गंगानगर लालगड भारत पाकिस्तान बाॅर्डर आंतकवादी बरोबर लढा दिला आहे. अशा एकुण २२ ठिकाणी सेवा दिल्या आहेत एक सच्चा सैनिक म्हणुन नायक पद, हवलदार पदवी,शांतीदुत,सुवर्ण पदक, गोल्डमेडल ही मिळविले आहेत. धन्य अशा महान सैनिकास या कार्यक्रमात धुळे,अजंग,जयनागर,दोंदवाडा,शिंदखेडा,वणी,नंदुरबार,भामेर परिसरातुन नातलग आले होते. सर्वांना खुप खुप आनंद होत होता ,कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार विजय बागुल सर व तुषार माळी सर यांनी केले. आयोजक—सुनंदाबाई इंदर माळी (आईसाहेब), राकेश इंद र भदाने, समस्त भदाणे परिवार अजंग (धुळे), राहुल,भैया कैलास माळी, वरवडे शिरपूर यांनी केले होते.