अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ई-मेल द्वारे तक्रार दाखल मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी घेतली दखल




अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता  दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ई-मेल द्वारे तक्रार दाखल

  मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी घेतली दखल  

अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावरील शिरपूर ते शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झालेली असून आपल्या महामार्ग प्रशासनाची याकडे कोणतेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही. या पुलाजवळ ब.ना. कुंभार गुरुजी माध्यमिक हायस्कूल असून शहादा ते बोराडी व गावातील जनतेच्या वाहतुकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असतांना या पुलावरील रस्ता एक अपघाताचा केंद्रबिंदू ठरु शकेल असे मोठ मोठे व खोल खड्डे रस्त्यावर निर्माण झालेले आहेत. अशी परिस्थिती या रस्त्यांची झालेली असून प्रशासनाचे डोळेझाक व दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. असे समस्त वाघाडी ग्रामस्थांचे म्हणने आहे. व यास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास निवेदानाव्दारे सुचित करीत असून रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे ही विनंती. तसेच दि. ३ मार्च २०२५ रोजी प्रायव्हेट गाडीत विद्यार्थी कॉलेजला जात असताना अपघात झाला असून प्रायव्हेट गाडी चालकाने खड्डे वाचविण्याचा प्रयत्न करीत असतांना मागील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने त्यात १ विद्यार्थी जागीच मृत्यु झाला या प्रायव्हेट गाडीत मध्ये किमान विद्यार्थी १० ते १२ विद्यार्थी प्रवास करीत होते. ते सर्व विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत. तर हा अपघात झाल्यानंतर मी मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्या दुरुस्तीचे काम केंव्हा  होईल याबाबत विचारपूस केली असता, तेथील कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले  की, अंकलेश्वर-ब-हाणपूर हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही. तर हा रस्ता एन. एच. आय. च्या जळगाव अंडर मध्ये येतो. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांना ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली असल्याचे  मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी माहिती दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने