शिरपूर लाच प्रकरणात अटकेतील औषध निरीक्षकाकडे भ्रष्टाचाराचे घबाड?
धुळे प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि त्यांच्या खाजगी पेंटर जैन यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली होती.
मात्र यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून
लोकसेवक किशोर देशमुख औषध निरीक्षक, अन्न व औषषे प्रशासन कार्यालय धुळे यांच्या जळगांव व धुळे
येथील त्यांच्या घरांच्या घरझडतीमध्ये एकुण ३२,०५२००/- रुपये रोख रक्कम व
१७,६८,८५० /- रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने असा एकुण ४९,७३,९५०/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे या अधिकाऱ्याकडे सापडलेली ही मालमत्ता म्हणजे भ्रष्टाचाराचे घबाड आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
विभागाने औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यांचे जळगांव येथील राहते घराची घरझाडती घेतली असता १,२०१००/- रुपये रोख, १७,४६,१००/- रुपये,किमतीचे सोन्याचे दागिने, ₹२,७६०/ - रुपये किमतीचे चांदीने दागिने मिळुन आल्याने
ते जप्त करण्यात आले असुन त्याची चौकशी सुरु आहे.
औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यांचे धुळे येथील राहते घरात ७५,८१०/- रुपये रोख रक्कम मिळुन आल्याने सदरची रक्कम जप्त करण्यात आली
आहे .
सदर गुन्हयातील नमुद आरोपीतांना मा. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि. १३.०३.२० २५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास ला.प्र.विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक मा.शर्मिष्ठा घारगे - वालावलकर व धुळे ला.प्र.विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी हा करीत आहेत.
त्यामुळे जिल्हाभरात हे लाच प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून एसीबी कडून करण्यात आलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.