*बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा महोत्सव -2025* दोडाईचा (अख्तर शाह )




**बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा महोत्सव -2025*

दोडाईचा (अख्तर शाह )
सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छ . संभाजीनगर संचालित , खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय ,दोंडाईचा जिल्हा धुळे येथे  माननीय संस्था अध्यक्ष  शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दोंडाईचा येथील सुवर्णकार भवन येथे उत्साहात पार पडला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा शहर अध्यक्ष माननीय श्री प्रवीणभाऊ महाजन यांनी स्वीकारले .तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्था अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब संस्था सचिव माननीय सौ छायाताई साळुंके पाटील ताईसाहेब ,संस्थेचे उपाध्यक्ष . सत्यम  सौ कोमल सत्यम साळुंके . ,राष्ट्रवादी महिला धुळे जिल्हा अध्यक्षा  सौ पूजाताई नितीन खडसे  माजी सभापती  जितेंद्रसिंग गिरासे सर , जायन्टस प्राईड अध्यक्षा सौ. कुमुद अग्रवाल , उपाध्यक्षा सौ . विणा अग्रवाल , जेष्ठ पत्रकार . रविंद्र टाटिया सर .
पत्रकार अख्तर शाह
डॉ अनिकेत पाटिल  अवनी पाटील  सौ . प्रेरणाताई राजपूत उपजिल्हा प्रमुख अनुलोम संघटना, श्री.जितेंद्र बोधवानी सद्गुरु फुटवेअर चे मालक,प्राध्यापक  अशोक आव्हाड , अनमोल तिलानी , श्रीविकेश भालचंदानी, सागर रूपचंदानी,कु .दर्शना साठे लिओ क्लब अध्यक्षइत्यादी मान्यवरांनी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली .सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले .नंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली .सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी,व्यसनमुक्तीपर नाटिका , राम आयेंगे गीत, क्या कहना हे आनंद दर्शवणारे गीत ,देशभक्तीपर गीत , अंधश्रद्धा निर्मूलन भगतगीत,पांडुरंग माऊली चे गीत ,आणि सर्वात शेवटी लेझीम नृत्य ,अशा विविध गीतांवर नृत्य सादर करून सुंदरतेने आपली कला दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला .सर्व प्रेक्षकांनी कौतुकाने टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढवण्याचा प्रयत्न केला .कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्षांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची आणि त्यांना शिकवत असलेल्या त्यांच्या विशेष शिक्षकांचे आणि शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे खूप कौतुक केले .संस्था अध्यक्ष साहेबांनी विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जी संकल्पना राबवली त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन केले .कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता .तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोंडाईचा शहरातील समाजसेवक . रावसाहेब भामरे यांनी कार्यक्रम करण्यासाठी हॉल उपलब्ध करून दिला .स्टार्च फॅक्टरीचे सीईओ श्री राजेंद्र जी परमार साहेब यांनी विद्यार्थी आणि पालकांना भोजनाची व्यवस्था केली .सौ पूजा ताई खडसे ,सौ कुमुद अग्रवाल, सौ वीणा अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना वेशभूषा साठी लागणारे पेहराव उपलब्ध करून दिले . गोपाल हॉटेलचे मालक श्री विजय जी पटेल यांनी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था केली .सौ प्रेरणा ताई राजपूत यांनी सर्व प्रेक्षकांना आणि मान्यवरांना पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल्सची मदत केली . ज्ञानेश्वर बागुल यांनी साऊंड सिस्टिम आणि बैठक व्यवस्थेचे साधन उपलब्ध करून दिले .श्री छोटू मराठी मराठा मंडप दोंडाईचा यांनी कार्यक्रमाला लागणारे इतर साहित्य उपलब्ध करून दिले .आर जे फोटोग्राफरचे मालक श्री राज महाजन यांनी संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग स्वतः मार्फत करून दिले . चि . मोहित वालेचा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे फोटोग्राफी स्वतः मार्फत करून दिले .तसेच श्री पंडित वाघ या पालकांनी कार्यक्रमासाठी लागणारे पुष्पगुच्छ कार्यक्रमाला उपलब्ध करून दिले .संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेबांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व समाजसेवकांचे आभार मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना डसायकॉलॉजीस्ट  किशोर शेलार सर आणि  रमेश पाटील सर यांनी केले .सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी केले .शाळेतील मुख्याध्यापिका सर्व शिक्षक / शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने