पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक

 



पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक 


शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी योगेश कुमार शांताराम पाटील यांना तक्रारदाराकडून 5000 रुपयांची रक्कम लाज म्हणून स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी रंगेहात अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार हे मौजे बुडकी विहीर,ता. शिरपुर येथील रहिवासी आहेत. तकारदार यांच्या आईच्या नांवे सांगवी वनक्षेत्रात वन जमीन असुन तकारदार यांनी आईच्या नावे सदर वन जमीनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन २०२२-२०२४ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत ४०,००,००० /-रु शासकीय अुनदान मंजुर

होण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह दि.२०.०४.२० २२ रोजी ऑनलाईन अर्ज करुन त्यानुसार त्यांना सदर योजनेअंतर्गत विहीर खोदण्याकरीता ४,oo,000/ -रु शासकीय अुनदान मंजुर झाले आहे.


योगेश पाटील, कृषि विस्तार अधिकारी, पंचायत समिती , शिरपुर यांनी तकारदार यांच्या आईच्या नांवे मंजुर झालेल्या सिंचन विहीरीच्या जागेची स्थळ पाहणी करुन तकारदार व त्यांच्या आईचा फोटो काढन नेला होता. त्यावेळी कृषि विस्तार अधिकारी

योगेश पाटील यांनी तकारदार यांना विहीरीचे लाईन आउट करतेवेळी ५,००००/ - रु त्यांना द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि.0७.०२.२०२५ रोजी ला.प्र.विभाग, धुळे कार्यालयात येवुन लेखी तकार दिली होती.


सदर तक्रारीची पंचांसमक्ष आज दि.०९.०२.२०२५ रोजी पडताळणी केली असता कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तकारदार यांच्याकडे ५००००/-

रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम मौजे बोराडी, ता. शिरपुर येथील स्टेट बॅके समोर स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुष्द शिरपुर तालुका पो.स्टे. थयेथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिंबधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे - वालावलकर यांच्या मार्गदर्शना खाली,लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण

पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली असुन गु्हयाचा पुढील तपास सुरु आहे



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने