दहशत माजवणाऱ्या तीन आरोपींना थाळनेर पोलिसांकडून अटक
शिरपूर प्रतिनिधी - सध्या तालुक्यात विविध गावात यात्रा उत्सव साजरा होत आहे. याच दरम्यान गावातील शांतता कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देऊन गुंडगिरी करून दहशत मजवणाऱ्या तीन युवकांना थाळनेर पोलिसांनी स्टेशन गुरनं २५/२०२५ भारतीय न्याय संहिती कलम ३१०(२), ३२४(४),३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल होताच गुन्हयातील ०३ आरोपी अटक केले.थाळनेर पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीचे परिसरातून स्वागत होत आहे.
थाळनेर पोलीस ठाण्यात दि.०९/०२/२०२५ रोजी तक्ररदार अविनाश सुपडु सावळे रा. भोरटेक ता. शिरपुर जि. धुळे यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रारदिली की, दिनांक ०७/०२/२०२५ रोजी भोरटेक गावाचे यात्रे दरम्यान रात्री ००.३० ते ०१.३० वाजेचे दरम्यान झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन आरोपी १) मिथुन आनंदगिर गोसावी २) पवन नाना बंजारा ३) महेंद्र ऊर्फ विक्की वसंत पाटील इतर ६/७ अज्ञात इसमांनी तक्रारदार यांना मारहाण, शिवीगाळ करत त्यांचे खिश्यातील १८४०/- रुपये बळजबरीने काढून नेले. त्यानंतर पुन्हा पहाटे ०३.०० वाजेचे सुमारास वरील आरोपी व त्याचे सोबत आणखी ५/६ इसम असे एकुण १५ ते १६ आरोपी ७/८ मोटार सायकली वर हातात काठया, लोखंडी रॉड घेऊन जोर जोरात वाहनाचा हॉर्न वाजवून "कोणाचे गांडीत दम असेल तर बाहेर या" असे बोलुन गावातील भुषण जाधव यांची चारचाकी वाहन, अशोक अहिरे, पदमाकर जाधव यांनी मोटार सायकलची तोडफोड करुन तसेच रघुनाथ चौधरी यांचे घराच्या खिडकीच्या काचा फोडुन नुकसान करुन गावात दहशद निर्माण केली होती.
सदर आरोपीतांचे दहशती मुळे तक्रारदार इसम तक्रार देणे कामी पुढे येत नव्हता. तक्रारदार यांना गावकऱ्यांनी धिर देऊन त्यांचे मन परिवर्तन केले, त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा दाखल झाले नंतर आम्ही लागलीच दोन वेगवेगळे पथक करुन गुप्त माहितीव्दारा माहिती काढून आरोपीतांचा शोध घेऊन गुन्हयातील मुख्य आरोपी १) मिथुन आनंदगिर गोसावी २) पवन नाना बंजारा ३) महेंद्र ऊर्फ विक्की वसंत पाटील सर्व रा. होळनांथे ता. शिरपुर यांना ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीतांना अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो श्री. श्रीकांत डिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अतिरिक्त कार्यभार श्री. के. के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर पो. स्टे प्रभारी श्री. शत्रुघ्न पाटील, पोसई/समाधान भाटेवाल, पोसई/दिलीप पवार, पोहेको विजय ठाकुर, पोहेको / शामसिंग वळवी, पोहेकॉ/ संजय धनगर, पोना/ भुषण रामोळे, पोकॉ/ उमाकांत वाघ, चापोकों/दिलीप मोरे अशांनी मिळून केली आहे.
