राजपूत समाज संस्था आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरांस उस्फुर्त प्रतिसाद
शिरपूर प्रतिनिधी : येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थे तर्फे स्व. इंद्रसिंह भाऊसाहेब मेमोरियल हॉल (राजपूत भवन) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात तालुक्यातील राजपूत समाजातील नागरिकांसाठी मोतीबिंदू व डोळ्यां संबंधित सर्व आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.
राजपूत समाज संस्था शिरपूर तर्फे तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. नुकतेच राजपूत समाजातील युवकांसाठी शहरात संस्कार शिबीराचे आयोजन ही करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 73 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 35 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
सुरत येथील प्रसिद्ध कपडा उद्योजक श्री रविंद्रसिंग भटेसिंग राजपूत (रविशेठ देऊर शहादा) हे या शिबिरांसाठी प्रायोजक म्हणून लाभले तसेच गुजरातमधील आणंद येथील शंकरा आय हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. दोघांचे राजपूत संस्था विश्वस्त मंडळातर्फे आभार मानण्यात आले.
शिबिराच्या सुरुवातीला राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली व नेत्रतज्ञ डॉ. दीपक जाधव व डॉ. शीतल जाधव यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत व उपाध्यक्ष योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आला.
शिबिरात संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया, संस्थेचे विश्वस्त महेंद्रसिंग राजपूत, कल्पनाताई नेतेंद्रसिंग राजपूत (मा जि प सदस्या), प्रतिभा पुष्पराज जाधव, तसेच निवृत्त ना तहसिलदार नेतेंद्रसिंग राजपूत, नि पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग राजपूत, कृषि अधिकारी पुष्पराज जाधव, भैरवसिंग राजपूत, बापू झेंडूसिंग राजपूत, भाजपा उद्योग आघाडीचे जितेंद्रसिंग राजपूत, हितेंद्रसिंग राजपूत, जयसिंग राणा जातोडे, दीपक राजपूत (मंडपवाले), जयपाल राजपूत (अमृततुल्य चाय), पद्मावती महिला मंडळाच्या भावना प्रशांत राजपूत, चेतना ज्ञानूसिंग चौधरी, नंदा सुधाकर राजपूत, उजनताई सिसोदिया, मंगलाताई जाधव, सुनिता गिरासे, मिनाबाई गिरासे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

