शिरपूर काळापाणी गावातील तरुणांच्या हस्ते प्रकरणात सात आरोपींच्या विरोधात कोणाच्या गुन्हा

 



शिरपूर काळापाणी गावातील तरुणांच्या हस्ते प्रकरणात सात आरोपींच्या विरोधात कोणाच्या गुन्हा 


शिरपूर प्रतिनिधी - 


दिनांक 19/02/25 रोजी उमर्दा गावातील तरुणाची काळापाणी गावातील काही लोकांनी मिळून मारहाण करत हत्या केली होती. याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला 07 आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दिनांक 24/02/25 पावेतो 09 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


दिनांक 19/02/25 रोजी काळापाणी गावातुन मृतदेह उचलून आणल्यानंतर उमर्दा गावातील काही लोकांनी काळापाणी गावातच थांबुन मयताच्या नातेवाईकांना आरोपींच्या घरांची तोडफोड करण्यासाठी व त्यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी दिली. त्यावरून वरील लोकांनी काळापाणी गावात घुसून मरणास कारणीभूत असलेल्या संशयित आरोपीची व त्यांच्या शेजारील इतर घरांची तोडफोड केली तसेच तेथील महिला व इतर वयस्कर लोकांना मारहाण करत त्यांच्या घरातील दाग, दागिने, पैसे धान्य इत्यादी ची लूटमार केली. त्यानंतर उमर्दा गावातील लोकांनी दिनांक 20/02/2025 रोजी प्रेत अंत्यविधीसाठी उमर्दा गावी घेऊन न जाता काळापाणी या गावी नेले व तेथे गुन्ह्यातील संशयित आरोर्पीच्या घरासमोर मयताचा अंतिम संस्कार केला. त्यानंतर त्यातील काही लोकांनी पुन्हा काळापाणी गावातील लोकांच्या घरांची तोडफोड केली. दिनांक 21/02/25 व दि.22/02/25 रोजीसुद्धा पोलीस गस्त निघून गेल्यावर उमर्दा गावातील वरील लोक काळापाणी गावात घुसून तेथील लोकांचे संसार उपयोगी भांडे, धान्य व इतर साहित्य लुटून नेत होते. याबाबत काळापाणी येथील ग्रामस्थांनी काल दिनांक 23/02/25 रोजी पोलीस स्टेशनला लुटमार करणाऱ्या गावातील लोकांची नावासह फिर्याद दिल्याने खालील लोकांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, गुन्हा करण्यास चिथावणी देणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे यासारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातही दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.


दोन्ही गुन्ह्यांमध्ये आता पावेतो एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे. तरी यापुढे एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर त्याचा बदला म्हणून आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या घराची जाळपोळ करणे, त्याच्या घरासमोर अंतिम संस्कार करणे किंवा तेथील किमती ऐवज, धान्य इत्यादी ची लूटमार करणे, असा गुन्हा करण्यासाठी इतरांना प्रवृत्त करणे, त्यांना चिथावणी देणे असे सर्व कृत्य गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. भविष्यात कोणीही असे कृत्य करु नये असे आवाहन शिरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे.


सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल बसावे, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ/ संतोष पाटील, पोहेकॉ / संदिप ठाकरे, पोहेकॉ/ शेखर बागुल, पोकों/योगेश मोरे, पोकॉ/ संजय भोई, पोकॉ/ कृष्णा पावरा, पोकॉ/ स्वप्निल बांगर, पोकों/ सुनिल पवार, पोकॉ/भुषण पाटील, पोकॉ/ दिनकर पवार, पोकॉ/धनराज गोपाळ पोकों/ईसरार फारुकी, पोकों/ मनोज पाटील, यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने