महाशिवरात्रीनिमित्त 1008 श्री पार्थिव शिवपूजन सोहळा
श्री नागेश्वर सेवा संस्थांन चा उपक्रम, या धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी - श्री नागेश्वर सेवा संस्थान, अजनाड बंगला तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या वतीने मागील वर्षाच्या सफल आयोजनानंतर यावर्षी देखील दिनांक 26 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त 1008 श्री पार्थिव शिवपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता या धार्मिक विधी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य यजमान माननीय श्री भूपेश भाई पटेल अध्यक्ष नागेश्वर सेवा संस्थान हे असणार आहेत.
सर्वच शिवभक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र नागेश्वर येथे १००८ पार्थिव शिवपूजन आयोजित करीत आहोत. या शिव सोहळ्यात १0०८ भाविक एकाच वेळी सहभागी होतील.
पार्थिव शिवपूजन हे ब्रत, सर्वच मनोकामना पूर्ण करणारे आहे.शिवपूजनासोबतच रुद्राभिषेक, बिल्वार्चन, शिव जप सुध्दा करुन घेतला जाईल. या रुद्राभिषेक साठी खास त्रंबकेश्वर येथील विप्राना पाचारण केलेले आहे.
तरी गावोगावी राहणाऱ्या सर्वच शिवभक्तांनी, या
शिवसोहब्याचा लाभ घेवून आम्हास उपकृत करावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पूजेत सहभागी होण्यासाठी 9850636121, 8390816651,9423906046, 9421329409, 8329244174, 8999662791,7820844810
या नंबरला संपर्क करुन, नाव नोंदवावे
पूजेची यादी लगेच आपणास व्हाट्सअप ला येईल.
त्यामुळे व्हाटस्ऑप नंबरनेच फोन करावा.
पूजेसाठी साधारपणे रुपये २५१/ - सहयोग राशी आहे.पूजेला बसणारे व सोबतीला येणारे सगळ्यांची फराळाची व्यवस्था श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान मंदीराकडूनच आहे.फराळासाठी काही सोबत आणू् नये. शिवपूजनाला विवाहित जोडपे, कुमारीका मुली, अविवाहित मुलं,दुदैवानं वैधव्य आलेल्या माता, एकटा पुरुष एकटी भगिनी,अशा सगव्यांना पूजेला बसण्याचा अधिकार आहे.अट फक्त वय १२ पेक्षा 'जास्ती असावे.
पूजा साहित्याची यादी वरील क्रमांकावर संपर्क करुन मागून, घ्यावी.
आजच आपली सहयोग राशी २५१/- रु. भरुन कुपन ताब्यात घेवून घ्यावे.पूजेसाठी एक तासाचा कालावधीच लागणार आहे.
पूजेची वेळ सायंकाळी ६.ooते ७.oo असेल पूजेसाठी लागणारी मातीची शिवपिंड इथेच मिळेल तसेच प्रासादिक रुद्राक्ष मंदिराकडून मिळेल.
यानंतर शिवमहिमा चरित्रावर आथारीत नृत्य व वादनाचे भव्य सादरीकरण नादक्रिष्ण ढोलताशा पथक व क्रिष्णकला डान्स अकॅडमी यांच्याकडून
वेळ : संध्या ७.३० ते ८.३०वा. सादर होणार आहे.
रुद्राक्ष वाटप :
पुजेला बसलेल्या सवांना मंत्रुक्त रुद्राक्षांचे वाटप जागेवरच केले जाईल.
प्रसाद वाटप :
कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप. रात्री १२ वाजता मुख्यमंदिरात महाभिषेक
तरी सर्व भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आणि या महापूजेत सामील व्हावे असे आवाहन श्री नागेश्वर सेवा संस्थान यांच्याकडून करण्यात आले आहे.