आता शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे तहसीलदार यांचे आवाहन




आता शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी 

शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे तहसीलदार यांचे आवाहन

शिरपूर प्रतिनिधी -

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचविता यावा, याकरीता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत शिरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करुन शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे यासाठी तहसील कार्यालय येथे बैठक घेण्यात आली त्यावेळी गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित होते 

राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेत उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पीएम किसान योजनेचे अनुदान, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांना विविध योजनांचा  लाभ जलदगतीने देण्यासाठी शिरपूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळणार आहे. 

प्रत्येक शेतकऱ्यांची नोंदणी ही कृषि सहायक, तलाठी, ग्रामसेवक, यांच्या मार्फत ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे 
सामाईक खातेदार  शेतकरी असल्यास प्रत्येक सामाईक खातेदार शेतकऱ्यांची नोंदणी करावी. 

ॲग्रिस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक गावात कॅम्प आयोजित केले जाणार असून या कॅम्पमध्ये गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले आधार कार्ड, पॅनकार्ड, बॅक खात्याचा तपशील, आधार संलग्न मोबाईल क्रमांक घेवून निशुल्क आपला शेतकरी ओळख क्रमांक्र तयार करुन घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी यांनी  केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने