*महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथी निमित्त शिरपूर महाराणा प्रताप राजपूत समाज संस्थे तर्फे प्रतिमा पूजनव अभिवादन*




*महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथी निमित्त शिरपूर महाराणा प्रताप राजपूत समाज संस्थे तर्फे प्रतिमा पूजनव अभिवादन*



शिरपूर प्रतिनिधी : महाराणा प्रतापसिंह हे भारतातील महान योद्ध्यांपैकी एक होते. त्यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड (राजस्थान) येथे वडील महाराणा उदयसिंह आणि आई महाराणी जयवंतादेवी यांच्या कुटुंबात झाला. उदयसिंग यांच्या २५ मुलांपैकी महाराणा प्रतापसिंह हे ज्येष्ठ पुत्र होते. महाराणा उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांना मेवाडचा 54वा राजा म्हणून त्यांचा उत्तराधिकारी बनवण्यात आले.



महाराणा प्रतापसिंह यांचे जीवन मोठ्या संघर्षात व्यतीत झाले, कारण त्यांनी कोणत्याही किंमतीवर मुघलांची गुलामगिरी स्वीकारली नाही. हल्दीघाटीच्या लढाईत, अकबराच्या सैन्याला चिरडल्यानंतर, संपूर्ण मेवाड राज्य मिळविण्यासाठी त्यांनी 21 वर्षे संघर्ष केला आणि मेवाडचा बराचसा भागावर विजय मिळवून 19 जानेवारी 1597 मध्ये चावंड येथे जगाचा निरोप घेतला.

चावंडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वढोली नावाच्या गावात महाराणा प्रताप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराणा प्रताप यांच्या निधनाची बातमी ऐकून अचानक अकबराचा विश्वास बसला नाही. पण हे सत्य असल्याचे कळताच अकबराला देखील रडू कोसळले.



राष्ट्रगौरव विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या 428व्या पुण्यतिथी निमित्त शिरपूर येथील स्व इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल, (राजपूत भवन) येथे महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थे तर्फे महाराणाजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूर चे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, विश्वस्त सौ प्रतिभा पुष्पराज जाधव, नितीनबाबा गिरासे, जयपालसिंग गिरासे, किरणसिंग सिसोदिया, महेंद्रसिंग राजपूत, प्रेमसिंग राजपूत, सहकार भारतीचे प्रकोष्ट प्रमुख प्रकाशसिंग सिसोदिया, वृक्षमित्र शिवाजी राजपूत, वाठोडा माजी सरपंच ज्ञानूसिंग चौधरी, नयनसिंग राजपूत, राज सिसोदिया, मुन्ना राजपूत, दिलीप राजपूत, सौ चेतना चौधरी, सौ अरुणा मगनसिंग गिरासे, सौ सुरेखा कोमलसिंग राजपूत व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने