**दोडाईचा प्रताप रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक क्रीडा दिवस 2024-25 संपन्न**
दोडाईचा (अख्तर शाह)
प्रताप रॉयल इंग्लिश मीडियम स्कुलच्या मैदानावर संपन्न
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख पाहुणे- माननीय. श्री भागवत पाटील साहेब ( API दोंडाईचा, पोलिस स्टेशन) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय अतिथी मा. श्री एम. के. पाटील साहेब ( जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे ), मा. श्री. अनिल भावसार ( सहाय्यक प्रकल्प अधिकारी नगर परिषद, दोंडाईचा ), मा. श्री नितीन लाहोटी ( प्रगतशील शेतकरी, कोपर्ली ), मा. श्री हर्षवर्धन बागल ( कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सौ लताताई कोठावदे,(अध्यक्ष जायन्टस् ग्रुप ऑफ दोंडाईचा सहेली ) सौ. मिनाक्षीताई जाधव ( जायन्टस् सहेली ग्रुप सचीव दोंडाईचा ) व मा. श्री चंद्रशेखर सिसोदिया साहेब (सिव्हिल इंजिनिअर) हे मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाची सुरुवात द्वीप प्रज्वलन व गणेश वंदना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मा. श्री. हर्षवर्धन बागल, मा. श्री अनिल भावसार व शाळेच्या चेअरमन मा. सौ. चंद्रकला सिसोदिया मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मेहनतीचे कौतुक केले. तसेच विविध प्रकारचे क्रीडा खेळ, झुम्बा डान्स, पिरॅमिड, मार्चपास्ट ( परेड ) विद्यार्थ्यांनी आकर्षक असे सादरीकरण करून या क्रीडा महोत्सवाने रसिकांचे व मान्यवरांचे मन जिंकून घेतले. शाळेचे प्रिन्सिपल व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच सूत्रसंचालन शितल जगताप मॅडम व जितेंद्र निकम सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शाळेचे प्रिन्सिपल श्री ललित कुवर सर व श्री विशाल राजपूत सर यांनी आभार व्यक्त करून केले.
