मस्साजोग सरपंच हत्याऱ्यांना फाशी द्या - शिरपूर सरपंच संघटनेचे निवेदन*




*मस्साजोग सरपंच हत्याऱ्यांना फाशी द्या - शिरपूर सरपंच संघटनेचे निवेदन* 

शिरपूर प्रतिनिधी : सरपंच सेवा महासंघ शिरपूर तर्फे ना तहसिलदार श्री पेंढारकर यांना संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राहुलआबा रंधे, तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मस्साजोग येथील आदर्श सरपंच (स्व) संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व SIT मार्फत चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा. या हत्तेतील गुन्हेगार व त्या मागील सूत्रधारांन विरुद्ध कठोर कारवाई करुण दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. शिरपूर येथील सरपंच सेवा महासंघ व सरपंच परिषद तर्फे तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. 

बीड जिल्ह्यातील, केज तालुक्यात असलेले मस्साजोग गावाचे आदर्श सरपंच (स्व) संतोष देशमुख यांचे दि. 09/12/2024 रोजी भरदिवसा अपहरण करून 3-4 दिवस कोंडून ठेवत त्यांच्यावर सतत अन्याय, अत्याचार केला गेला व नंतर अतिशय निर्दयीपणे, अमानुष पद्धतीने निघृण हत्या केली गेली. हृदय हेलावून टाकणाऱ्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात आक्रोश होत आहे.

सरपंच संघटनेतर्फे मागणी करण्यात आली की राज्यातील सरपंचावर होणारे हल्ले लक्ष्यात घेता स्वरक्षणासाठी सरपंचांना शस्त्र परवाने द्यावे, विमा संरक्षण द्यावे. जर सरपंचावर असेच हल्ले होत राहिले तर सरपंच गावातील विकास कामे कसे करतील? हा मोठा प्रश्न सरपंचांवर येऊन ठेपला आहे. जर सरपंच सुरक्षित नसतील तर ते गांव कसे सुरक्षित ठेवू शकतील? 

मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून त्यांना आर्थिक मदत द्यावी या ठळक मागण्या सरपंच सेवा महासंघ तर्फे करण्यात आल्या.  

निवेदनावर सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राहुलआबा रंधे, तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, वाघाडी सरपंच किशोर माळी, वाठोडा सरपंच नारायण कोंडूसिंग चौधरी, अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत, बाळदे उपसरपंच निंबा तोताराम पाटील, नांथे सरपंच नेपालसिंग राजपूत, हिंगोणी सरपंच सोमा भिल, पाथर्डे उपसरपंच देविदास पाटील, शिंगावे उपसरपंच रविंद्र हिंमतराव पाटील, साकवद सरपंच जिजाबाई गजू भिल, असलीतांडा सरपंच सुनिल कोळी, जातोडा सरपंच रावसाहेब धनगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने