श्रीक्षेत्र नागेश्वर येथे माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा संपन्न*




*श्रीक्षेत्र नागेश्वर येथे माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा संपन्न*


 होळनांथे:  शालेय जीवनातील गोड आठवणी, मित्र आणि मैत्रिणी चा सहवास आणि गुरुजनांच्या आशीर्वाद या सर्व गतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी जवळपास 29 वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीच्या मळा फुलला, पुन्हा एकदा सर्वांची भेट घेण्याचा योग आला, आणि बालपणीच्या जीवनातील शाळा एका दिवसासाठी का असेल ती पुन्हा भरली, विविध क्षेत्रात आयुष्यात भरारी घेतलेल्या सर्वांनी एकत्र येत पुन्हा एकदा गुरुजनांच्या आशीर्वाद स्नेह संमेलनाचे आयोजन केले.


 दि.29/12/2024 रोजी होळनांथे येथील श्री.रा.रा.खंडेलवाल वर्ष 1995 इ.10 वी चे माजी विद्यार्थी व शिक्षक  यांचा स्नेह मेळावा श्री क्षेत्र नागेश्वर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जेष्ठ गुरुवर्य श्री.एस.यु.पाटील सर यांनी भूषविले.कार्यक्रमाची सुरवात किसान विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर व्यंकटराव रणधीर व विद्यालयातील दिवंगत गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.श्री.आर.सी.पाटील सर,श्री.एच.झेड.सैंदाणे सर,श्रीमती.विसपुते मॅडम,श्री.जी.बी.पाटील सर,श्री.एस.एच.चौधरी सर,श्री.बी.एस.इंदासे सर,श्री.आर.बी.पाटील सर,श्री.यु.आर.पाटील सर या सर्व गुरुजनांनी कार्यक्रमात सहभागी होऊन या प्रसंगी मार्गदर्शन केले.माजी विद्यार्थ्यांन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन सर्व गुरुजनांचे आभार मानले.या प्रसंगी गुरुजणांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात श्री एस.यु.पाटील सर यांनी सर्व विद्यार्थांना आरोग्यासाठी आणि समाजाभिमुख चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
       कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी जितेंद्र जैन, नरेंद्र राजपूत,भटू गुजर,निलेश पाटील,मच्छिन्द्र पाटील,विजय गुजर,डॉ. अंकुश पाटील,अजित राजपूत,कपिल परदेशी,रवींद्र जैन,निलेश जैन,जयपाल राजपूत,भोपाल राजपूत,नितेंन्द्र राजपूत,मनोहर खिलोसिया,महेश् भदाने,ईश्वर धनगर,देविदास चौधरी, विश्वनाथ गुजर,लीलाचंद भोई,माजी विद्यार्थिनी अनिता जैन,वंदना राजपूत,कल्पना राजपूत,नैना बागुल,सुरेखा कुंभार,सुनीता ढोले,भारती राजपूत यांनी मिळून परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.मकेश सैंदाणे यांनी केले तर आभार जितेंद्र इंदासे यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने