आश्वासन देत नाही.. मी वचन देतो !
डॉ.जितेंद्र ठाकूर यांचा वचननामा
शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणूक सुरू झाली. एकीकडे विकासाचे गोडवे गायले जात आहेत. विकासाची गाथा वाचली जात असताना दुसरीकडे मात्र कोणतीही सत्ता नाही,कोणताही पक्ष नसलेल्या स्वाभिमानी उमेदवाराला कर्तुत्व विचारले जात आहे. तुम्ही काय केले ? तुम्ही काय करणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे जनतेने सेवेची संधी दिल्यास मी काय करणार आहे अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी एक वचन नामा प्रसिद्ध करून जनतेला आश्वासन दिले आहे. पाहूया काय आहे या वचननाम्यात...
* शिरपूर तालुक्यातील प्रत्येक रहिवाशाचा एक लाख रुपयांचा आरोग्य विमा काढणार.
* शिरपूर तालुक्यासाठी एमआयडीसी आणून तेथे नामांकित उद्योगांना निमंत्रण! त्यातून हजारो नोकऱ्या आणि स्वयंरोजगार निर्माण करणार.
* शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा अद्ययावत करणार. मोफत शिक्षण देणार्या संस्थांना चालना देणार.
*शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणात दाखल करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार.
* शिरपूर तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना, दूध डेअरीसह विविध सहकारी प्रकल्पांना मदत मिळवून देत पुनर्जिवित करणार.
* नवे सहकारी प्रकल्प उभारुन सहकार गतिमान करणार.
* नियमित रोजगार मेळावे, कंपन्यांचे भरती मेळावे यांच्या माध्यमातून शिरपूरच्या युवकांसाठी भरीव रोजगार उपलब्ध करून देणार.
*अल्पशिक्षित व अशिक्षित बंधू, भगिनींसाठी गाव-पाड्यांवर कौशल्य प्रशिक्षण योजना केंद्र सुरु करणार.
* शिरपूर तालुक्यात शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अद्ययावत करणार, शिरपूरसाठी सुसज्ज ट्रॉमा केअर सेंटर उभारणार.
*महिलांसाठी गृह उद्योगांना चालना देणार. शिरपूर एमआयडीसीमध्ये महिलांच्या उद्योगांसाठी स्वतंत्र राखीव जागांची तरतूद करणार.
* शिरपूर तालुक्यात एमआयडीसीमध्ये आदिवासीं बांधवांना उद्योगांसाठी स्वतंत्र जागा देणार !
* सिंचनापासून वंचित ठेवलेल्या शिरपूर तालुक्याच्या पश्चिम भागासाठी नवे सिंचन प्रकल्प आणणार !
*शिरपूर शहरातील ४० वर्षापासून जागा नावावर करण्यापासून वंचित ठेवलेल्या रहिवाशांना त्यांच्या जागा नियमानुकुल व नावावर करुन सिटी सर्व्हे नंबर मिळावा यासाठी संपूर्ण क्षमतेने पाठपुरावा करणार.
* शहरातील दुकानांची भाडेवाढ प्रचंड आहे. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. कोणत्या नियमाने ही भाडेवाढ होते याचे उत्तर कोणीच देत
नाही. सदर भाडेवाढ ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार !
* तालुक्यातील अनेर आणि करवंद हे दोन्ही प्रकल्प गाळमुक्त करणार. १२ लघुप्रकल्पांमधील गाळ काढून त्यांची साठवण आणि सिंचन क्षमता वाढवणार.
* शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, औषधे रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी संस्थांना चालना देणार.
*शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च वाचवण्यासाठी एमआरइजीएस सारख्या योजनांतून शासनाने मजुरी अदा करावी यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार.
त्यामुळे बळिराजावरील खूप मोठा भार हलका होणार आहे.
*शिरपूर शहरातील नागरिकांवरचा वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य करांचा बोझा हटवून तो कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
* वनजमिनीच्या हक्कापासून वंचित आदिवासी बांधवांना समान न्यायाने वनपट्टे (वन सातबारे) मिळवून देणार.
* आदिवासी शेतकऱ्यांना सर्व कृषी विषयक योजनांचा लाभ मिळवून देणार.
* पेसांतर्गत भरतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी पाठपुरावा करणार.
*एमपीएससी, यूपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी शासकीय मदतीने अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरु करणार.
*पोलिस आणि लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी शासकीय प्रशिक्षण केंद्र उघडणार.
*शिरपूरच्या नागरिकांना संपूर्ण टोल माफी मिळावी म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करणार, शिरपूरला दुर्गंधीमुक्त करणार.
*सावळदे आणि गिधाडे येथील तापी नदीवरील पुलांवर संरक्षक कठडे बसवण्यासाठी पाठपुरावा करणार.
* शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रात तालुका स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष योजना राबवणार.
*शिरपूर तालुका सिकलसेल मुक्त व्हावा यासाठी विशेष मोहीम राबवणार !
*दलित, अल्पसंख्यांक वस्त्यांसाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व नव्या लाभाच्या योजनांसाठी प्रयत्न करणार.
काळानुसार तालुक्याचे मागणी आणि गरज यानुसार लोककल्याणकारी योजना राबविणार.
असा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला असून मी आश्वासन देत नाही तर आपणास वचन देतो याची हमी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.

