महामानवांना वंदन करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रचाराच्या शुभारंभ
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणूक 2024 साठी चौरंगी लढत होत असून यात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी अपक्ष, बहुजन समाज पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशी सरळ लढत होत आहे.
काल माघारीच्या अंतिम दिवसानंतर चिन्हांचे वाटप झाले आणि आज दिनांक 5 नोव्हेंबर 2024 पासून सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड बुधा मला पावरा यांनी शिरपूर शहरात महामानवांना अभिवादन करून प्रचाराचा आरंभ केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांच्या गरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. तो खऱ्या अर्थाने सामान्यांच्या आवाज आहे. हा पक्ष नेहमीच अन्यायाच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढत असतो. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा महाविकास आघाडीच्या सोबत असल्याने त्यांनी या निवडणुकीत विधानसभेसाठी जागेची मागणी केली होती. महाविकास आघाडीने शिरपूरची जागा ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडली आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि त्याचे सर्व कार्यकर्ते यांनी आपला उमेदवार बुधा मला पावरा यांना विधानसभेच्या रणांगणात उतरवले असून त्यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे.
आज त्यांनी शहरातील प्रमुख महामानवांना वंदन करून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आणि
कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचा हक्क मिळवण्यासाठी 'विळा कणीस' चिन्हावर आपला ठाम विश्वास ठेवा. एकजुटीने परिवर्तन घडवूया! असे आवाहन करत प्रचारात आघाडी घेतली आहे.
