नंदुरबार विधानसभेत मतदारांच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसणार?
नाराजीमुळे मतदारांच्या कल अपक्ष उमेदवारांकडे
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार विधानसभा 03 या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत आता सर्व राजकीय पक्षांसोबत अपक्षांच्या देखील बोलबाला असून प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारातून मतदारांच्या मनात घर करण्याच्या प्रयत्न करत आहे.
या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. काँग्रेस पक्षाच्या देखील मोठा जनाधार आहे. मोठे राजकीय घराणे या निवडणुकीत उतरले आहेत. असे असताना देखील या विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
नंदुरबार विधानसभेत काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार दिला आहे. मात्र या उमेदवारास शिवसेना शिंदे गटाचा लोकांच्या पाठिंबा असल्याने काँग्रेसच्या पारंपारिक मतदार मुस्लिम समाज नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. मुस्लिम समाज हा पारंपारिक काँग्रेसच्या मतदार आहे मात्र काँग्रेस कडून उभे असलेल्या उमेदवाराला जातीवादी पक्षांच्या पाठिंबा असल्याने अशा उमेदवाराला आम्ही का निवडून द्यावे असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
या नारजीच्या फटका काँग्रेसला बसून त्याच्या फायदा
अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी होताना दिसत आहे.
अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांनी ग्रामीण भागाच्या प्रचार दौरा केला असता त्यांना मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. काँग्रेस वरील नाराज मुस्लिम मतदारांनी देखील त्यांना प्रथम पसंती दिली आहे. त्यामुळे मतदार संघातील मतदारांच्या उत्साह विश्वास, आणि राजकीय पक्षांची नाराजी याच्या फायदा आता अपक्ष उमेदवारांना होत असताना दिसत असल्यामुळे त्यांना देखील आपला विजयाच्या विश्वास वाटत आहे.
या निवडणुकीत तरी अपक्ष उमेदवारांची मोठ्या राजकीय पक्षांच्या सोबत लढत होत असली तरी मतदारांच्या कल पाहून अपक्ष उमेदवारांच्या देखील विश्वास वाढला असून जनतेला परिवर्तन हवे आहे आणि परिवर्तनासाठी अपक्ष हा एकमेव पर्याय मतदारांसमोर आहे असे मत या विधानसभेत उमेदवारी करणारे उमेदवार रवींद्र वळवी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.
