शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी शासनाचे प्रतिनिधी व मतदान अधिकारी यांना निवडणूक प्रशिक्षण




शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी 
 
शासनाचे प्रतिनिधी व मतदान अधिकारी यांना निवडणूक प्रशिक्षण 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने आपले आता जयत तयारी पूर्ण केली असून शासनाचे प्रतिनिधी व मतदान अधिकारी यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले आहे.


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदान केंद्रावर नियुक्त करावयाच्या मतदान अधिकारी / कर्मचारी यांचे ०९, शिरपूर विधानसभा (अ.ज.) मतदार संघ करिता दि.१२/११/२०२४ रोजी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र.१ व इतर मतदान अधिकारी यांचे व्दितीय प्रशिक्षण राजगोपाल भंडारी हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास उपस्थिती मतदान केंद्राध्यक्ष (PRO) - 359 सहायक मतदान केंद्राध्यक्ष (FPO)-364 मतदान अधिकारी 379
एकूण 1102 कर्मचारी यांना मतदान प्रशिक्षण देण्यात आले आहे .

दुसरे सत्रात EVM चे हाताळणी प्रशिक्षण घेण्यात आले तसेच कर्मचारी यांची पात्रता परीक्षा देखील घेण्यात आली आहे.

प्रशिक्षणास 27 गैरहजर कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई बाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. 

सदर प्रशिक्षण शरद मंडलिक,. निवडणूक निर्णय अधिकारी आणि महेंद्र माळी,  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने