शिरपूर - सोशल मीडिया वरील जातीयद्वेष पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा
निवडणूक निर्णय अधिकारी आणि शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी उद्या दिनांक वीस रोजी मतदान होणार असून या आधीच शिरपूर शहरात आचारसंहिता नियमांचे भंग होऊन सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवण्याच्या प्रयत्न होत असून अशा समाजकंटकांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना तक्रारदार आनंद उर्फ (वावडया) दत्तात्रय पाटील आणि मनोज रमेश सोनावणे (पाटील) रा. शिरपूर जि. धुळे यांनी तक्रार दाखल केली आहे.
यात नमूद करण्यात आले आहे ती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सुरु आहे. काल दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रचार संपलेला आहे. सर्व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आपआपले बॅनर व पोस्टर काढून घेतलेले आहेत. प्रचारासाठी सभा देखील बंद झालेल्या आहेत. मात्र आज दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारपासून अचानकपणे अनेक सोशाल मीडिया प्लेट फॉर्मवर (इंस्टाग्राम ,फेसबुक ,व्हाट्सअप व इतर) शिरपूर शहरात दगडफेक झाली असून महापुरुषांचा अपमान झाला आहे या आशयाची पोस्ट व्हायरल केली जात आहे.
या पोस्टमध्ये देण्यात आलेला फोटो देखील दिशाभूल करणारा असून सदर घटना ज्या ठिकाणी झाल्याचे नमूद केले आहे तेथे (पोलीस दल) गृह विभागातर्फे उभारण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहेत.
सदर पोस्ट व्हायरल करण्यामागे शिरपुर शहरातील जातीय सलोखा संपवून जातीय द्वेष पसरविण्याचा हेतू दिसत आहे तसेच या पोस्टच्या माध्यमातून विशिष्ट उमेदवारास फायदा पोहोचवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.
सदरची बाब ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. त्यामुळे याबाबत अति तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मागील दहा दिवसात एकही दगडफेकीची नोंद अथवा गुन्हा दाखल नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय द्वेष पसरवणान्या, पोस्ट व्हायरल करणान्या इसमान विरुद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीयवादी पोस्ट व्हायरल करू नये यासंदर्भात ताकीद देण्णारा संदेश शिरपूर शहर पोलीस स्टेशन व धुळे जिल्हा पोलीस विभागातर्फे तातडीने प्रसिद्ध करण्यात यावा.
अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.
