50 वर्षानंतर फुलला मैत्रीचा मळा आर आर खंडेलवाल विद्यालय होळनांथे येथे सन 1974 -75 बॅच चा स्नेह मेळावा संपन्न




50 वर्षानंतर फुलला मैत्रीचा मळा
आर आर खंडेलवाल विद्यालय होळनांथे येथे सन 1974 -75 बॅच चा स्नेह मेळावा संपन्न

शिरपूर महेंद्रसिंग राजपूत -

किसान विद्या प्रसारक संस्था संचलित शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील आर आर खंडेलवाल विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 10 नोव्हेंबर रोजी या विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या 1974 ते 75 या वर्षाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा संपन्न झाला. त्यामुळे तब्बल पन्नास वर्षानंतर ज्यावेळी हे सर्व विद्यार्थी जवळपास 65 वयाच्या घरात आहेत अशावेळी त्यांनी एकत्र येत आपल्या गुरुजनांच्या समवेत पुन्हा एकदा त्यांच्या आशीर्वाद घेत जीवनाच्या या तिसऱ्या टप्प्यात आपला स्नेह मेळावा आयोजित केला. त्यामुळे हा मेळावा एक प्रमुख आकर्षणाचे केंद्र आणि चर्चेचा विषय आहे. यासाठी या सर्व जुन्या मित्रांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या शोध घेत तब्बल 36 मित्र-मैत्रिणी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेतला आणि या कार्यक्रमाची संकल्पना तयार झाली.



जीवनाच्या या उंबरठ्यावर पुन्हा एकदा आपण आपल्या शालेय जीवनाचे आनंद, अनुभव मित्राने मैत्रिणी यांची भेट घ्यावी आणि पुन्हा एकदा आपले सुख दुःख वाटून घ्यावेत, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा या निर्मल भावनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यात फक्त माजी विद्यार्थी आले नव्हते, तर ज्या गुरुजनांच्या छडीच्या मार खाऊन हे विद्यार्थी घडले, नंतर त्यांनी समाज घडवला, प्रत्येक जण जीवनात विविध शिखरावर पोहोचला, त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुदेखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळे आपण एरवी ज्येष्ठ नागरिकांचे मिळावे  आपण पाहत असतो परंतु या वयात शालेय विद्यार्थ्यांच्या मेळावा घेणारे हे माजी विद्यार्थी खरोखर कौतुकास पात्र आहेत. 



आपल्या जुन्या मित्रांना भेटून पुन्हा एकदा जीवनात त्यांना नवसंजीवनी प्राप्त झाली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, एकमेकांना पुन्हा जवळ येण्याची संधी मिळाली, सुखदुःख वाटून घेण्याची एकमेकांना आधार देण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे या सर्व जुन्या मित्र आणि मैत्रिणीसाठी हा मेळावा म्हणजे एक नव संजीवनी होता. 



त्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन देखील या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात विविध यश संपादन केले. त्यापैकी  नायब तहसीलदार  , शाखा अभियंता  बँक मॅनेजर , सेल्स मॅनेजर, इंडियन ऑफिस सुप्रीटेंडेंट, लॅब असिस्टंट, जिल्हा परिषद कर्मचारी, दूध डेरी कर्मचारी, खाजगी पतसंस्था कर्मचारी, हॉटेल व्यवसायिक, भाजीपाला व्यवसाय, अंगणवाडी शिक्षिका, गृहिणी ,शिक्षक ,शेतकरी या विविध क्षेत्रात त्यांनी आपले नावलौकिक कमावले. 

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, प्राध्यापक साईदास चव्हाण, डी.ए. चौधरी सर, आनंदा पाटील सर, जी एम जाधव, सौ लिलाबाई जाधव, यु बी चौधरी, सौ प्रमिला चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक पी ओ गुजर, सौ कोकिडाबाई गुजर, आप्पासाहेब भटू सिंह राजपूत, पत्रकार महेंद्रसिंह राजपूत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन आनंदा पाटील सर यांनी केले.

 याप्रसंगी आपल्या गुरूंचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांचे देखील शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी  संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, प्राध्यापक साईदास चव्हाण इ.मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले.


यावेळी आपल्यातून निघून गेलेले दिवंगत सवंगडी , गुरुवर्य आणि जवळचे मित्रपरिवार यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या सर्व कार्यक्रमासाठी दौलत कुमार  पवार, भागवत  कुंभार, हितेंद्र राजपूत, रघुनाथ  सोमवंशी, पि.के .महाले , लोटन न्हावी,सौ नलिनी कुलकर्णी,  मदन परदेशी यांनी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने