नंदुरबार विधानसभा 03 अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांचा मतदारांना वचननामा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




नंदुरबार विधानसभा 03 अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांचा मतदारांना वचननामा 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे 

नंदुरबार विधानसभा 03 या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असलेले रवींद्र वळवी यांनी जनसामान्यांच्या सामान्य प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम हाती घेतले असून जनतेने संधी दिल्यास मी काय काम करेल याच्या एक वचन नामा मतदारांच्या हाती दिला आहे. 

निवडणूक आली की मतदारांच्या मागण्या पुढे येतात, उमेदवारांकडून देखील अनेक आश्वासने दिली जातात. यात आता अपक्ष उमेदवार देखील मागे राहिले नसून त्यांनी देखील मतदारांसाठी आपला वचन नामा तयार केला आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केले आहेत. आणि या आधारेच ते आपला प्रचार करत आहेत. 

पाहूया काय आहे त्यांच्या वचननामा

१) नंदुरबार मतदार संघातील प्रकाशा बुराई प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार.

2) नंदुरबार मतदार संघातील बेरोजगार तरुणांसाठी एम.आय.डी.सी. सुरु करुन रोजगाराची संधी निर्माण करणार.

३) OTSP क्षेत्रातील आदिवासी करिता पेसा कायद्याची प्रभावी अंम्मलबजावणी करणार.

४) शेतकऱ्यांना वीजपंप व घरगुती बिलातून सुटका करण्यासाठी सौर उर्जावर आधारीत साहित्यसाठी १००% अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.

५) शेतीमालाला हमीभाव दरवर्षी मिळून देणार.

६) मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी शेतीची सर्व कामे व इतर कामे रोजगार हमी योजनेतून राबवणार.

७) SC.ST इतर मागासवर्ग EWS प्रवर्गासाठी खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणारा कायदा करणार.

८) अल्पसंख्यांक वर्गातील पीएचडी आणि MFILL विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद फेलोशिप योजना अल्पसंख्याक समाजातील शिकणाऱ्या विद्यार्थीना स्कॉलरशिपसाठी मदत करणार.

९) गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र व ग्रंथालय प्रत्येक गावात उभारण्यासाठी प्रयत्न करणार.

१०) मुस्लीम बांधवांकरीता LT ग्राऊंडवर अंतरराष्ट्रीय औद्योगिक मंडी उभारण्यासाठी प्रयत्न करणार.

११) जि.प. गट स्तरावर पोलीस व सैनिकी भरतीची तयारी करणार्या युवकांकरीता ग्राउंड उपलब्ध करणार.

१२) लाडकी बहीण योजना नियमित सुरू ठेवून कुटुंबातील मुला-मुलींकरता माहे २० ते ३० हजार कमवतील असा रोजगार उपलब्ध करून देणार.

 १३) घरकुल लाभार्थी यांना घरे बांधण्यासाठी गावठाण जागा उपलब्ध करुन बांधकामासाठी लागणारी रेती, मुरूम, खडी, विटा शासनामार्फत कमी दरात उपलब्ध करणार. व नगरपालीका हद्दीत राहणार्या तमाम गरीब कुटुंबाना जागेसह २ वर्षांत घरकुल उपलब्ध करुन देणार.

१४) गाव पातळीवर प्रत्येक समाजासाठी सामाजिक भवन उभारणार.

१५) ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा सेविका व जलसुरक्षक यांना त्यांचे मानधन वाढवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार.

१६) दर महिन्याला गांव पातळीवर नागरीकांची आरोग्य शिवी नार्फत आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करणार.

१७) चिली पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करणार.

१८) पपई, केळी, कापूस, मिरची व इतर पिकांसाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासासनस्तरावर ज्ञर्थ सहाय्यासाठी प्रयत्न करणार.

१९) ठिबक सिंचन व यांत्रिकीकरण साहित्य अनुदान शेतक-यांना त्वरीत राप देणार.

२०) आदिवासी दिन-दलित व मुली-महिलावरील अत्याचार थांबवण्यासः कायदा प्रभावीपणे राबविणार.

२१) मतदारसंघातील भूमीहीन शेतमजुरांना जमीन देण्यासाठी शासन स्तरकी करुन जमीन उपलब्ध करुन देणार.

२२) NT, OBC, open घटकांच्या महामंडळाच्या निधी उपलब्ध करून देणार. २३) कर्ज बाजारी शेतकरी, दुष्काळ, अवकाळी, पाऊस अशा नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन आत्महत्या थांबवणार.

२४) नंदुरबार नगरपालीकेला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणात तापीचे पाणी टाकुन टंचाईमुक्त नगरपालिका करणारच.

२५) नंदुरबार आदिवासी जिल्हा असुन देखील आदिवासी क्रांतीवारांचा एकही पुतळा नाही. भगवान एकलव्य. बिरसा मुंडा जयपाल मुंडा यांचे पुतळे उभारुन आदिवासी जनतेला गुलामीत ठेवणार्याच्या मानसिकतेमधुन आदिवासी समाजाला स्वाभीमान मिळवुन देणार.

असे वचन त्यांनी आपल्या मतदारांना दिले आहे. आता या निवडणुकीत मतदार राजा कोणाला साथ देतो हे निकाल नंतर समोर येईलच. मात्र राष्ट्रीय पक्षांसोबत आता अपक्ष उमेदवार देखील आपला वचननामा सादर करून प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने