शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी तर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्ष उमेदवारी अर्ज भरणार!!




शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी तर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्ष  उमेदवारी अर्ज भरणार!!

 शिरपूर:महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे 
निवडणुकीतील उमेदवार कॉम्रेड बुधा मला पावरा व कॉम्रेड सतीलाल पावरा यांचे पक्षातर्फे अर्ज शिरपूर विधानसभा 29 ऑक्टोबर  रोजी भरण्यात येणार आहे.निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष साठी सोडला असून महाविकास आघाडीचे घटक पक्ष. काँग्रेस पक्षाचे माननीय बाळासाहेब थोरात,. नाना  पटोले,शिवसेना उद्धव गट पक्षाचे माननीय उद्धवजी ठाकरे,  संजय राऊत,राष्ट्रवादी  चे शरदचंद्रजी पवार  साहेब ,माननीय जयंतराव जी पाटील यांचे शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनःपूर्वक,आभार व्यक्त करण्यात आले.

 यावेळेस एडवोकेट हिरालाल परदेशी यांच्या कार्यालयात पक्षातर्फे निवडणुकीसाठी 
असलेले अधिकृत उमेदवार   भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे बुधा मला पावरा ,सतीलाल पावरा, अर्ज  सादर मिरवणूक ने भरण्यात येणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. झुलेलाल नगर _ मेन रोड पाच कंदील _  कुमार टेक _ तहसील कार्यालय शिरपूर पर्यंत काढण्यात येणार आहे. तरी  महा विकास आघाडी शिरपूर तालुका सर्व पदाधिकारी   , कार्यकर्ते नी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य ,एडवोकेट हिरालालपरदेशी, कॉम्रेड अर्जुन कोडी, शिरपूर शहर ,सेक्रेटरी जितेंद्र देवरे, कवरलाल कोळी, तुळशीराम पाटील, एडवोकेट रोशन परदेशी, अशोक गोसावी, प्रमोद पाटील, संजय बाशिंगे,
कार्यकर्त्यांच्या  केले आहे.

शिरपूर विधानसभा निवडणूक तालुक्यातील  
महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन तालुक्यात परिवर्तन करू व सत्तेचे झालेले केंद्रीकरण थांबून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही उमेदवार कॉम्रेड बुधा मला पावरा यांनी दिली, 
जनशक्तीच्या जोरावर धनशक्तीला मात देऊन परिवर्तन घडवून आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. शिरपूर विधानसभेची जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी एडवोकेट  कॉम्रेडसुभाष लांडे,भाकप राज्य सह सचिव कॉम्रेड राजू देसले, भाकप राष्ट्रीय सचिव डॉक्टर भालचंद्र काँगो, काँ .  प्रकाश रेड्डी , मिलींद रानडे,भाकप वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून शिरपूर विधानसभा मतदारसंघ भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळून दिला म्हणून कम्युनिस्ट पक्षांचे नेत्यांचे देखील शिरपूर तालुका कम्युनिस्ट पक्षातर्फे अभिनंदन करण्यात येऊन कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी कामाला लागण्याचा निर्धार करण्यात येऊन शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


*दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जमतील उमेदवारांचे फॉर्म दाखल  करण्यासाठी  जमतील दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता झुलेलाल नगर शिरपूर उमेदवारांचे संपर्क कार्यालय 
रामसिंग नगर शेजारील कार्यालयापासून रॅलीने समर्थकांसह व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना ंसोबत घेऊन अधिकृत फॉर्म दाखल करण्यात येणार आहे.  

उमेदवाराचा फॉर्म दाखल करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारणी सचिव डॉक्टर भालचंद्र कांगो,  ऍड सुभाष लांडे सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र,राज्य सह सचिव कॉम्रेड राजू देसले , डॉ राम बाहेती भाकप जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड वसंत पाटील, उपस्थित राहणार आहेत.

तरी शिरपूर तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कार्यकारणी सदस्य भाकप एडवोकेट हिरालाल परदेशी, तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने