शिरपूरचा विद्यार्थी वेदांत वाघ यांचे हँडबॉल स्पर्धेत यश
शिरपूर प्रतिनिधी - सध्या शिरपूर तालुक्यातील खेळाडू हे विविध खेळांमध्ये विशेष नाविन्य मिळवत असून ते शिरपूर तालुक्याच्या मान देखील उंचावत आहेत.
राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत आर. सी.पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी वेदांत अनिल वाघ याची हैदराबाद येथे झालेल्या हँडबॉल सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग झाल्यामुळे संस्थेचे आणि माझी शिक्षण आणि क्रीडामंत्री आमदार अमरीश भाई पटेल तसेच शिरपूरचे भाग्यविधाते माझी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल तसेच आर.सी.पटेल एज्युकेशन ट्रस्टचे संचालक राजगोपाल जी भंडारी सर तसेच आर.सी.पटेल एज्युकेशन ट्रस्टचे सी.ई.ओ डॉक्टर उमेश जी शर्मा यांनी कौतुक केले. या खेळाडूला मार्गदर्शक म्हणून हँडबॉल प्रशिक्षक सचिन सिसोदिया आणि प्रशांत गुलाले यांचे मार्गदर्शन लाभले .संस्थेच्या वतीने यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांना हँडबॉल असोसिएशन धुळे यांच्या वतीने देखील शुभेच्छा देण्यात आले आहेत.
