भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून घटक पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आजपर्यंत शिरपूर तालुक्यात केलेल्या भरीव कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आणि त्यांना शिरपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी ची संधी दिली. पक्षाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून कॉम्रेड बुधा मला पावरा यांची निवड करण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दिनांक 29 रोजी शक्ती प्रदर्शन करत भरला आहे.
यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरातील झुलेलाल नगर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा संपन्न झाला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सर्व सामान्य जनतेच्या पक्ष असून आजपर्यंत कम्युनिस्ट पक्षाने सामान्य नागरिकांच्या हक्काची लढाई लढली आहे. आणि म्हणून जनतेने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या लढ्यात पक्षाच्या उमेदवाराला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले. यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
मेळाव्याचे अध्यक्ष शिरपूर तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर पाटील. होते.
मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन
भोई, मुस्लिम अल्पसंख्यांकाचे आशिफ भाई,
काँग्रेसचे शहराध्यक्ष उत्तमराव माळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राजू टेलर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अशपाक भाई,,. सामाजिक कार्यकर्ते जे के दादा, काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष मोहन नाना, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव,डॉक्टर भालचंद्र काँगो,,
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य
सेक्रेटरी एडवोकेट सुभाष लांडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले, प्राध्यापक कॉ बाहेती भास्कर शिंदे,
महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य एडवोकेट काँ.
हिरालाल परदेशी, धुळे जिल्हा भाकपा सेक्रेटरी वसंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका सेक्रेटरी कॉ. एडवोकेट संतोष पाटील , उपस्थित
होते. सतीलाल पावरा यांचा देखील नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.
मेळावा, रॅलीत मोठ्या संख्येने महिला पुरुष
जन संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
