माजी आमदार अनिल गोटे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, धुळे शहराची उमेदवारी जाहीर
धु ळे : धुळे शहर विधानसभचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अखेर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री येथे झालेल्या या कार्यक्रमात धुळे शहर विधानसभेसाठी गोटे यांना शिवसेनेच्या वतीने एबी फॉर्म देण्यात आला असून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
धुळे शहर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहीर केला. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत रसिकेज सुरू होती. शिवसेना पक्षातून धुळे जिल्ह्यातून अनेक उमेदवार इच्छुक असताना देखील मात्र शिवसेनेने उमेदवार आयात करून उमेदवारी जाहीर केली. माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि महाविकास आघाडीकडून गोटे यांची उमेदवारी निश्चित झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्यात पुन्हा चर्चा झाली. चर्चेनंतर ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा ए बी फॉर्म देखील गोटे यांना देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच धुळे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, तेजस गोटे, सलीम शेख, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे महाविकास आघाडी होतो धुळे शहरासाठी काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी इत्यादी पक्ष देखील इच्छुक होते. मात्र आता या वाटाणातील महाविकास आघाडीच्या ती घटकातून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. त्यामुळे धुळे शहरासाठी आघाडीत बिघाडी होईल का आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष काय भूमिका घेतील, कोणाची नाराजी कोणाची बंडखोरी याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
