व्हाईस ऑफ मीडियाच्या धुळे जिल्हा व शिरपूर तालुका संघटने कडून आनंद उत्सव
पत्रकारांचे महामंडळ मंजूर झाले म्हणून शासनाचे ऋणनिर्देश व भाजप आमदारांचा सन्मान
शिरपूर प्रतिनिधी - व्हाईस ऑफ व मीडिया धुळे जिल्हा व शिरपूर तालुका यांच्या वतीने जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सर्व पत्रकार मित्र यांनी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला आणि एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या स्वतंत्र महामंडळात मंजुरी दिली म्हणून शासनाचे ऋणनिर्देश व्यक्त करत शासनाचे प्रतिनिधी म्हणून तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या सन्मान करून त्यांना देखील पेढे भरवण्यात आले. आणि महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक संघटना व्हाईस ऑफ मीडिया ही साधारणतः कोरोना काळानंतर 2020 मध्ये जन्माला आली.
पत्रकारांनी पत्रकारांसाठी उभारलेला लढा म्हणजे वाईस ऑफ मीडिया. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी लावलेल्या या रोपट्याचे अवघ्या चार वर्षात वटवृक्ष झाला, राज्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे साडेसहा हजार सदस्य आहेत, देशभरात 03लाख 70 हजार सदस्य या संघटनेत कार्यरत आहेत. आणि आज व्हाईस ऑफ मीडिया जगातील 43 देशात काम करत आहे.
पत्रकारांचे घर ,आरोग्य ,मुलांचे शिक्षण, नवीन कौशल्य आणि सेवानिवृत्तीनंतर पुढे काय या "पंचसूत्री" वर व्हाईस ऑफ मीडिया काम करते.
नुकतीच काही दिवसांपूर्वी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक आणि शिर्डी येथे पार पडले. यावेळी अनेक आमदार खासदार राजकीय सामाजिक आणि कलाक्षेत्रातून मोठ्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून काम असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक समस्या आहेत. खासकरून यात आर्थिक समस्या वार्धक्यमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतात. त्यामुळे पत्रकारांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे. त्यात वार्षिक २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी अशी आग्रही मागणी व्हॉईस ऑफ मीडियाची राज्य सरकारकडे मागणी होती. यासाठी संघटनेने राज्यभरात विविध आंदोलने निवेदने उपोषण करून सदरची मागणी ही लावून धरली होती.
अखेर या व्हाईस ऑफ मीडियाच्या लढ्याला यश आले आणि महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या आणि वृत्तपत्र विक्रेता यांच्या स्वतंत्र महामंडळास मंजुरी दिली. आता यापुढे जोपर्यंत शासनाकडून या महामंडळास आर्थिक तरतूद केली जात नाही तोपर्यंत हा लढा असाच अविरत सुरू असेल.
यापुढे जाऊन हा लढा संपलेला नसून दहा वर्ष पत्रकारीतेत पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधीस्वीकृती देण्यात यावी. दहा वर्ष पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा आणि विनामूल्य उपचार सुविधा द्याव्यात. पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी संख्या (कोटा) ठरावावा. प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी. शासनाने पत्रकार संशोधन केंद्राला मान्यता द्यावी. शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे समान धोरण ठरविण्यात यावे. शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबविण्यात येऊन ज्येष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे. अशा अनेक मागण्यांसाठी व्हाईस व्हाईस ऑफ मीडियाच्या शासन दरबारी लढा सुरू आहे.
व्हाईस ऑफ मीडियाच्या या लढ्याला यश आले आणि पत्रकारांची मोठी मागणी महामंडळ स्थापनेला मंजुरी मिळाली. आणि म्हणून राज्यभरात पत्रकारांकडून शासनाचे अभिनंदन होत असून आभार व्यक्त केले जात आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल, उद्योगपती चिंतन भाई पटेल,ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते दिलीप लोहार, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के पाटील, माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुलकर्णी,धुळे जिल्ह्याचे वाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष भूषण अहिरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र माळी ,महेंद्र जाधव, तालुका अध्यक्ष भिका चव्हाण आणि शिरपूर तालुक्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार संपादक इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.
