पत्नीच्या खून करून फरार आरोपीस तालुका पोलिसांकडून अटक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील पत्नीच्या खून करून फरार झालेल्या आरोपीला गोपनीय माहिती च्या आधारे सापळा रचून अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.
दि. 26/09/2024 रोजी तक्रारदार नामे धरमसिंग शिवदास पावरा वय 24 रा. कोडीद ता. शिरपूर जि. धुळे याने शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरुन गुरनं. 248/2024 भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल असून यातील तक्रारदार यांची बहिण नामे सुमन आत्माराम पावरा वय 28 वर्षे रा. बुडकी ता. शिरपूर जि. धुळे हिस तीचे पती आत्माराम बोण्या पावरा वय 30 वर्षे रा. बुडकी ता. शिरपूर जि. धुळे हा दि. 23/09/2024 रोजी रात्री 11.00 व. पत्नी सुमन हिने आरोपीतास तुम्ही रोज रोज दारु का पितात? असे विचारणा केल्याने त्याचा राग येवून त्याने पत्नी सुमन हिचे पोटावर, कमरेवर लाथाबुक्यांनी जोरजोरात मारहाण करुन जबर दुखापती केले होते. यातील मयत सुमन हिस उपचार कामी हॉस्पीटल येथे दाखल केले असता ती दि. 24/09/2024 रोजी सायंकाळी 07.30 वाजता उपचारा दरम्याण मयत झाली आहे. त्यावरुन शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा त्याची पत्नी सुमन हि मयत झाल्याचे समजल्याने तेथून पळून गेला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांनी आरोपीताचा शोध घेणे कामी एक पथक तयार केले. त्यानुसार सदर पथक आरोपीताचा शोध घेत असतांना आरोपी हा बोराडी गावात लपलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने. सदर पथकाने बोराडी गावात सापळा लावुन आरोपी हा पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यास पकडून पोलीस ठाण्यात आणले त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने पत्नी सुमन हिस मारहाण केली होती व त्यात ती मयत झाली आहे अशी कबुली दिली असुन सदर आरोपीतास खुनाच्या आरोपाखाली अटक करुन न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दि. 30/09/2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.उपनि. श्री. मिलींद पचार हे करीत आहेत.
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो, अपर पोलिस अधीक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउपनि. मिलींद पवार, पोउपनि, मनोज कचरे पोहेकॉ राजु दिसले, पोहेकों संजय चव्हाण पोना मोहन पाटील, पोकॉ शिवाजी वसावे, चापोहेकॉ अल्ताफ मिर्झा अशांनी केली आहे.
